समृद्धी प्रतिष्ठानतर्फे फोनिक्स टीचर ट्रेनिंग कोर्स
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समृद्धी प्रतिष्ठान अंतर्गत मॉन्टेसरी शिवणकाम ब्युटी पार्लर सुंदर हस्ताक्षर हे सर्व प्रशिक्षण आहेत तर आता आणखीन महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी फोनिक्स टीचर ट्रेनिंग कोर्स हा देखील चालू करत आहोत.. त्याचे प्रशिक्षण प्रख्यात प्रा. शंकर गायकवाड हे प्रशिक्षण देतील. शंकर भिमराव गायकवाड ( एम ए इंग्लिश लीट) हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व लेखक असुन त्यांचा शिक्षण व व्यवसायिक क्षेत्रातील अनुभव हा 10 वर्षापेक्षा जास्त असून त्यांनी या आपल्या शैक्षणिक कार्यात स्पर्धा परीक्षेत असणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलेले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा फायदा घेऊन रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून घ्यावी.फोनिक्ससाठी लागणारे पुस्तक हे संस्थेकडून देण्यात येईल व व्यवसायासाठी मार्गदर्शन ही केले जाईल संपर्क समृद्धी प्रतिष्ठान अध्यक्षा सौ मीनाक्षी जाधव ८६६९१५३३२५
0 Comments