अल्पसंख्याक अधिकारी /कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी बाबासाहेब शेख तर जिल्हा सरचिटणीस पदी हजरत शेख यांची निवड

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हास्तरीय बैठक सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था नियमित सोलापूर या ठिकाणी घेण्यात होती. या बैठकीमध्ये अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एजाज भाई शेख यांचा राजीनामा मंजूर करून नूतन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदर तालुका करमाळा येथील शिक्षक बाबा शेख यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर तालुका मोहोळ येथील हजरत शेख यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली सर्व सभासदांनी विचार विनिमय करून सदरची निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सदस्य इस्माईल मत्तेखाणे , मुबारक मुल्ला , सादिक तांबोळी , शहानवाज मुल्ला, फिरोज शेख , अश्फाक शेख , बशीर तांबोळी , शफिक शेख , हमीद पठाण , हुसेन बारस्कर , रफिक शेख , इस्माईल मुर्डी व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते सर्वांच्या विचारांवर चर्चा करून निवड मात्र एकमताने करण्यात आली जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अधिवेशन घेऊन त्यामध्ये करण्यात येणार असल्याचे मावळते अध्यक्ष एजाज शेख यांनी सांगितले नूतन अध्यक्ष व सरचिटणीस यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला , सूत्रसंचालन मोईन शेख यांनी केले.
0 Comments