नातेपुते येथे दहा हजार वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ- राजकुमार हिवरकर पाटील
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे शिवसेना भवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधे असा दवाखाना शिवसेना भवन नातेपुते येथे सुरू करण्यात आला होता यावेळी ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, कोविड तपासणी, नेत्र तपासणी अशा तपासण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती माळशिरस तालुका शिवसेनेचे नेते राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले यावेळी वारकऱ्यांना ओ आर एस चे पाकीट त्याचबरोबर जखम झाली असेल तर त्यावर बँडेज लावणे मलमपट्टी करणे अशा प्रकारच्या सेवा या दवाखान्यातून पुरवण्यात आल्या दहा हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांना आरोग्य सेवा शिवसेनेकडून पुरवण्यात आल्या. नातेपुते शिवसेना भवन येथे वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं वारकऱ्यांना आरोग्य सेवा मिळाल्याने व चार्जिंग पॉइंटवर मोबाईल चार्जिंगची सुविधा केल्याने विठ्ठल भक्तांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करताना असंख्य वारकरी दिसत होते यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर सोनम दोशी, अनिता ठोंबरे, विद्या भुसारे, सुनंदा इंगोले, अनिता लाडगे, स्मिता ठोंबरे, भाजपचे मनोज जाधव, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हा सरचिटणीस रियाज शेख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments