बबनराव शिंदे यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी होवो यासाठी वारकऱ्यांना मोफत चहा व अल्पोपहार
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अमेरिकेमध्ये असून त्यांच्यावर होणारी हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी होवो यासाठी टेंभुर्णी मध्ये विविध ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी भाविक भक्तांना मोफत चहा,अल्पोपहार, केळी,लाडू,चिवडा यासारखे अनेक खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीचे औचित्य साधत असंच कुर्डूवाडी बायपास लगत असलेले श्री हॉटेलचे मालक अंकुश कुटे व शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण यांनी दादांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी होवो यासाठी बुधवार व गुरुवार या दोन दिवशी वारकऱ्यांना मोफत चहा बिस्कीट वाटप केले. व सर्व वारकऱ्यांसोबत मा आ बबनदादा शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी विठ्ठल-रुक्मिणींना साखडे घालण्यात आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडूनाना ढवळे, डेप्युटी ऍग्रीकल्चर ऑफिसर संजय ढवळे उपस्थित होते.
यावेळी मा सरपंच नवनाथ शिंदे,मा. उपसरपंच हनुमंत चव्हाण,अँड सचिन चव्हाण, सुनील भोसले, संतोष वाघमारे, धनंजय भोसले,सोमनाथ नलवडे,सुरज काझी,नागनाथ गायकवाड, स्वप्निल चव्हाण, राहुल सुतार, सोन्या सुतार,लहू कुटे, आबा कुटे यांनीही या उपक्रमास उपस्थित राहून वारकऱ्यांना चहा वाटप करण्यास सहकार्य केले.
0 Comments