Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला - जयसिंह मोहिते पाटील

 शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला - जयसिंह मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जाऊ द्यावे. आपली मते त्यांच्यावर लादू नयेत असे अवाहन संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी केले.
           स्मृतिभवन शंकरनगर येथे शिक्षण प्रसारक मंडळातील इयत्ता १०वी मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक व १२वी मध्ये ८० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकूण १४६ तर जेई नीट सीईटी मधील ५ अशा एकूण १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते.
        सदरचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सौ ऋतुजादेवी मोहिते पाटील, युवानेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, संचालक सुभाष दळवी, निशा गिरमे नारायण फुले, रामचंद्र गायकवाड बाळासाहेब सणस, पांडुरंग एकतपुरे, वसंत जाधव, उत्कर्ष शेटे प्रमुख उपस्थित होते.

 जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळांने १९८४ पासून संयुक्त परीक्षा पद्धत सुरू केली. या मुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली. सध्या स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांनी यशामुळे हुरळून जाऊ नये. गुणवत्तेमध्ये सातत्य ठेवावे.
 संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक गुणांचाही विकास करत सर्वांगीण विकास साधला आहे.
 टीव्ही, मोबाईलच्या जमान्यात महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती, खेळ, कला लोप पावत चालली असून ती जोपासण्याचे काम अकलूज मध्ये होत आहे. महिलासाठी नागपंचमीचा सोहळा शिवपार्वती मंदिरात साजरा होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
              प्रस्ताविकात युवा नेते सयाजीराजे मोहिते-पाटील म्हणाले, १९४८ साली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आज संस्थेच्या ५५ शाखेतून २६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी बौद्धिकते बरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घ्यावा.          संस्थेने खेळासाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडवावे असेही त्यांनी सांगितले.                          शासनाने मुख्यमंत्री आदर्शशाळा स्पर्धेत संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालयाला जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकासह रोख ११ लाख रुपये तर महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेस द्वितीय क्रमांकासह रोख ५ लाख रुपये देऊन गौरव केला आहे.    
          इयत्ता १०वी व १२वी मध्ये संस्थेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यामध्ये इयत्ता १०वी परीक्षेत कु. पौर्णिमा भांगे तिने९८.२० टक्के गुण मिळवत संस्थेत प्रथम, सिफा तांबोळी ९७ टक्के व ओंकार राऊत ९७ टक्के मिळवित विभागून द्वितीय,आर्या कुलकर्णी, इंद्रनील चव्हाण, गौरांग जामदार या तिघांनी ९६.८० टक्के मिळतील विभागून तृतीय यांचा समावेश आहे.
तर १२ वीत वरद कोतमिरे याने ८९.८३ टक्के  मिळवित संस्थेत प्रथम, कु. मनाली भुजबळ हिने ८९.५० टक्के मिळवित द्वितीय व कु. क्रांती पांढरे हिने ८९ टक्के मिळवित तृतीय यांचा समावेश आहे.  

प्रारंभी सहकार महर्षी व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील तसेच सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. सारे जहाँ से अच्छा या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी व आर. आर. पाटील यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments