Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठल नामाची शाळा भरली' वाशिंबेच्या शरदचंद्रजी पवार विद्यालय व जि. प.शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन

 विठ्ठल नामाची शाळा भरली' वाशिंबेच्या शरदचंद्रजी पवार विद्यालय व जि. प.शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन




वाशिंबे (सचिन भोईटे):- शरदचंद्रजी पवार विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने बालदिंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात केले.या कार्यक्रमात बाल वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचे आयोजन करत विठ्ठल नामाचा गजर केला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भक्तीमय वातावरणात गावामध्ये केले होते. या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणिवांचा प्रसार झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेत विठ्ठल रुक्मिणीच्या नावाचा जयघोष केला.

सकाळी ९ वाजता शाळेच्या प्रंगाणातून दिंडीला सुरुवात झाली. विद्यालयातील ५२२ विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर भक्तीमय वातावरणात गावातील चौकात रिंगण सोहळ्याचे आयोजन केले. छोट्या वारकऱ्यांनी पारंपारागत पोशाखात, डोक्यावर तुळशीचे हार आणि हातात पथका घेऊन विठ्ठल भक्तीचा गजर केला. भक्ती गीते आणि विठ्ठलाच्या जीवनावरील छोटी नाटिका, गीते,अभंग  शिवाय विद्यार्थांनी पर्यावरण संरक्षणाचे, समाजहितचे  फलक दर्शवत संदेशही दिला.जि.प शाळेतील १८४ विद्यार्थ्यांमध्ये भक्ती आणि संस्कृती बद्दलचा उत्सव वाढलेला पाहायला मिळाला.

पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल ' अशा घोषणा दिल्या. नेहमीप्रमाणे दिंडीच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मूल्यांचा संदेश यशस्वी विद्यार्थ्यांनी दिला. शाळेमधील दिंडी सोहळ्यात गावातील युवकांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी पालक,महिलांनी विद्यार्थीचा दिंडी सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश यादव, जि. प.मुख्याध्यापक श्यामसुंदर शिंदे, व सर्व सहशिक्षक वर्गांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते.
Reactions

Post a Comment

0 Comments