सोलापूर शहरात विकास कामे होऊन शहराचा कायापालट करा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे, किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे साकडं सोलापूर शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध:-उपमुख्यमंत्री अजित पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात भरपूर विकास कामे होऊन शहराचा कायापालट व्हावा यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि महाराष्ट्र युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शहराच्या विकासासाठी त्यांच्याकडे साकडं घातले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांची यावेळी किसन जाधव नागेश गायकवाड आणि चेतन गायकवाड यांनी सोलापूर शहरातील विकास कामे, राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या साठी आपला सोलापूर दौरा निश्चित करावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्या संदर्भात यावेळी अजित पवार यांनी सकारात्मक चर्चा केली यावेळी किसन जाधव यांनी अजित पवारांना सोलापूर दौरा निश्चित करावी अशी मागणी करतात अजित पवारांनी सकारात्मक दाखवत लवकरच आपण सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहोत सोलापूर शहराच्या विकासासाठी मी स्वतः कटिबद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पक्ष संघटना देखील मजबूत होईल अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरम्यान यावेळी किसन जाधव नागेश गायकवाड आणि चेतन गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ट्रॉफी देऊन त्यांचे सन्मान करून शुभ आशीर्वाद घेतले. यावेळी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय व्हावे या दृष्टीने माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली लवकरच सोलापूर शहरात हे कार्यालय उभारेल. यावेळी उमेश जाधव, वीरेश सुतार, अजय नरवडे, महादेव राठोड, माऊली जरग, ऋषभ प्याटी आदींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment