महातपस्वी कुमारस्वामीजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग समजावून सांगणारे योगी------प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -राजेंद्र मायनाळ लिखित
महातपस्वी श्री कुमार स्वामी जीवन व कार्य ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन* आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ आयोजित
प.पू.महातस्वी श्री कुमारस्वामीजीच्या 114 व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रकाशन व वार्षिक स्नेह मेळाव्या च्या कार्यक्रमात राजेंद्र मायनाळ लिखित महातपस्वी श्री कुमारस्वामी जीवन व कार्य या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या शुभहस्ते झाले . याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, महातपस्वी कुमारस्वामीजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग समजून सांगणारे योगी होते. तसेच माझ्या वडिलांसोबत कुमार स्वामीजींचे दर्शन मला लाभले, त्यांना हाताचे फ्रॅक्चर झाले होते स्वामीजीकडून आशीर्वाद प्राप्त झाला व वडिलांचे दुखणे तात्काळ कमी झाले असा अनुभव त्यांनी याप्रसंगी सांगितला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. डॉ. माधवी रायते निवृत्त अधिष्ठाता, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर या उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या हा ग्रंथ मी पूर्णपणे वाचलेला आहे. खूप सुंदर रीतीने स्वामींचे चरित्राचे यामध्ये वर्णन केलेले आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी. ज्ञानेश्वरांच्या अनेक ओवीचा आधार घेत संतांच्या शिकवणीचा मतितार्थ त्यांनी सांगितला. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री विश्वनाथ चाकोते, माजी आमदार व ॲड. किरण कनाळे, ज्येष्ठ विधीज्ञ यांची समायोजित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक करताना मा. राजेंद्र मायनाळ, ग्रंथ लेखक यांनी स्वामीजींच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला व ग्रंथाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रा.मधुराताई वडापूरकर यांच्या भक्तीगीताने झाली. तदनंतर मान्यवर अतिथीगण यांच्या हस्ते श्रीं च्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ. लक्ष्मीकांत दामा यांचा सत्कार शाल व पुष्पहार देऊन राजेंद्र मायनाळ संस्थेचे अध्यक्ष यांनी केला. नीलकंठप्पा कोनापुरे उपाध्यक्ष यांच्या हस्ते श्री विश्वनाथ चाकोते, माजी आमदार यांचा सत्कार शाल व पुष्पहार देऊन करण्यात आला. तसेच ॲड.किरण कनाळे यांचा सत्कार संस्थेचे सचिव बाबासाहेब कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मा. डॉ. माधवी रायते यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त श्रीमती प्रतिभा मंगळूरकर यांचे कडून करण्यात आला.
रमेश चौगुले, विश्वस्त व सेवानिवृत्त उपअभियंता, सुरेश पवार ,उद्योजक, बाळासाहेब नष्टे, उद्योजक, यशवंत चिक्कल्ली, लक्ष्मण तल्लीकर, मधुराताई वडापूरकर, गंगाबाई कुदरी, बसवराज स्वामी, राजू माशाळे, महेश नरोनी, राहुल दसाडे, आदी मान्यवरांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ चौगुले, यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन विश्वनाथ म्हेत्रे,यांनी केले. सामूहिक मंगलआरतीने या महोत्सवाची सांगता झाली. महाप्रसादाची सोय यावेळी करण्यात आली होती.

0 Comments