सोलापूर ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 19, 2023

सोलापूर ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन साजरा

 सोलापूर ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन साजरा


 मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
सोलापूर ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे हे होते जिल्हा उपाध्यक्ष आरिफ काझी, नागेंद्र लॅबचे मालक रवींद्र गोगी,अमोल महामुनी प्रशांत उडता, उपस्थित होते तसेच जेस्ट फोटोग्राफर,सुधीर ननवरे, नारायण गायकवाड, भारत प्रक्षाळे, विधाते, इनुस पठाण, यांचा सत्कार करण्यात आला '
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला जोसेफ निसफोर व कॅमेरा याचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. असोसिएशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांना मानाचा फेटा बांधून शाल. श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.फोटोग्राफर व्यवसायिकांनी एक संघ राहून ग्राहकांना चांगली व दर्जेदार सेवा देत आपल्या व्यवसायामधून आर्थिक उन्नती साध्य करावी असे मनोगत सोलापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले. 
   कलावंत व फोटोग्राफर यांचे जवळचे नाते असून कलाकारांना घडविण्यासाठी छायाचित्रकार यांचा मोठा वाटा असल्याचे मनोगत सिने अभिनेते अमोल महामुनी यांनी व्यक्त केले तर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य राजन घाडगे यांनी फोटोग्राफर अभिव्यक्ती, भावना, कल्पना आणि क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर करुन भावी पिढीसाठी जतन करून ठेवतो प्रसार माध्यमांना बोलकं  आणि अचूकतेच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी वर्तमानपत्रातील बातमी वाचताना व पाहताना सोबत छायाचित्र असणे म्हणजे बातमी सर्वार्थाने पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले यावेळी सुधीर ननवरे, प्रशांत उडता, विधाते यांनी आपले विचार व्यक्त केले.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाजीसो जाधव,हरिभाऊ नगरे,सुधीर डोके, राजन घाडगे,संतोष साठे, रवी लोकरे, सिदु वाघे, तात्या लोंढे,महेश रोकडे, सागर साळुंखे, बालाजी नवले, शहाजी यादव, विकास साखरे, संदीप माने, साहेबराव सावंत, किशोर रंसिंग, रोहित गायकवाड,महेश सावंत, महेश रोकडे,आकाश महाडिक,दीपक पाटिल,अरबाज इनामदार, बाळासाहेब नाईकनवरे,कारण कोळी,कुलदीप शिंदे,विकास साखरे,दिनेश घोडके, उत्तम क्षीरसागर,योगेश भोसले,शंकर गोसावी,अजिंक्य नवले,रुपेश नगरे, सुशांत क्षीरसागर,किशोर होडगे, मानतेज बिराजदार, सागर साळुंखे,दिनेश जगडे, सिधू डींगणे, इराय्या स्वामी, व महिला फोटोग्राफर ऐश्वर्या कोष्टी आदि.सह शहरी व ग्रामीण भागातून फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages