केळी उत्पादक शेतकरी संघाच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

केळी उत्पादक शेतकरी संघाच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड

 केळी उत्पादक शेतकरी संघाच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड


 माळशिरस (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी माळशिरस तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या तालुकाध्यक्षपदी मळोली ता माळशिरस येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ ज्ञानेश्वर जाधव यांची रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी निवड करून  समारंभपूर्वक त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी शिवाजी जाधव, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, अरुण कळसुले, जयराम घाडगे, प्रा. अनिल जाधव ,आप्पासाहेब जाधव, पांडुरंग मासाळ, नवनाथ जयसिंगराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते 
  यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण म्हणाले की ,महाराष्ट्रात जळगावच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात केळी उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे निर्यातक्षम व दर्जेदार केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख होत असताना कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त भरघोस उत्पादन कसे घ्यावे याचबरोबर केळी लागवड करीत असताना शासनाच्या मनेरगा अंतर्गत असणाऱ्या योजनांचा लाभ कसा घ्यावा निर्यात क्षम केळीसाठी शासनाकडून मिळणारी वेगवेगळी अनुदाने व शेतकरी हितांच्या गोष्टीसाठी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे स्थापना झाली असून हा संघ कायमच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असणार आहे
  यावेळी मराठा सेवा संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निनाद पाटील व उपाध्यक्षपदी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मळोली चे शाखा अधिकारी सुदर्शन हंबीरे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तर मळोली सोसायटीचे 100% वसुली झाल्याबद्दल शाखाधिकारी सुदर्शन हंबीरे यांचा विशेष सत्कार मळोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिल जाधव यांनी तर आभार मळोली मा उपसरपंच चंद्रकांत जाधव यांनी मानले

चौकट
   भारत हा जगातील केळी उत्पादक म्हणून सर्वात मोठा देश आहे परंतु जगात केळी निर्यातदार म्हणून पहिल्या दहा देशांच्या यादीतही भारताचे नाव नाही यामुळे दर्जेदार निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी व शेतकऱ्याच्या उत्पादित दिलेल्या केळीला अग्रेसर भाव मिळवण्यासाठी संघाच्या विचारधारेनुसार काम करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन पदाला न्याय देऊ .
   नवनाथ जाधव ,नूतन माळशिरस तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages