आरोग्य विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

आरोग्य विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण

 आरोग्य विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण

नाशिक  (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनामित्त आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नाशिकचे रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे   मा. प्रभारी कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक     डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर, रोटरी क्बल ऑफ गोदावरीच्या अध्यक्षा श्रीमती संगिता लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
       याप्रसंगी  विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठ परिसरात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आली आहे. ग्रीन कॅम्पस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ आवारात औषधी व फुलझाडे प्रकारातील रोपांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन, आरोग्याची काळजी व सर्वांना शिक्षण याकरीता संकल्प व त्याचा अवलंब करावा. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांनी पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले.
 विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सागितले की, ’ग्रीन कॅम्पस’ उपक्रमातंर्गत विद्यापीठ आवारात अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते तीनशेपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी सकारत्मकतेने काम करावे असे त्यांनी सांगितले   
         याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ गोदावरीचे प्रकल्प अधिकारी श्री. मधुकर गायकवाड,    श्री. हुकूमचंद पाकळे, अध्यक्षा श्रीमती संगिता लोढा समवेत सचिव डॉ. सुरेश चावडा, श्रीमती मेघना नाथे, माजी अध्यक्ष श्री. नागेश पलोड, श्री. किरण सागोरे, श्री. रोहित सागोरे, सदस्य श्री. पंकज अहिरराव, श्री. रुपेश झटकरे, श्री. योगिराज राजपूत, श्री. बसावराज अंगाडी,     श्री. सुशांत जाधव आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास कोमल आहेर, विशाल शर्मा व प्रणय भंडारी उपस्थित होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे समन्वयन विद्यापीठाच्या हरित कक्षाचे प्रमुख तथा उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी केले. या कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages