सोलापूरकरांकडे निघाल्या ३५७ कोटींच्या नोटा; दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

सोलापूरकरांकडे निघाल्या ३५७ कोटींच्या नोटा; दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत

 सोलापूरकरांकडे निघाल्या ३५७ कोटींच्या नोटा; दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तीन महिन्यांपूर्वी सोलापूर शहर-जिल्ह्यात बहुतेक व्यवहारांमध्ये न दिसणाऱ्या दोन हजारांच्या जवळपास १७ लाख ८५ हजार नोटा (३५७ कोटी) एसबीआय व बॅंक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखांमध्ये २३ मे ते १८ ऑगस्ट या काळात जमा झाल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयानुसार ३० सप्टेंबरनंतर त्या नोटा चलनात नसणार आहेत.चलनातून पाचशे-हजाराच्या नोटा व्यवहारात दिसत नव्हत्या. छपाई मोठ्या प्रमाणावर होऊनही त्या नोटा व्यवहारात कमी झाल्या होत्या. काळापैसा त्या नोटांच्या माध्यमातून साठविल्याचा संशय होता या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय झाला आणि त्या नोटा चलनातून बाद ठरविण्यात आल्या. त्यानंतर दोन हजार रुपयांसह इतर नोटांची नव्याने छपाई झाली. मात्र, कालांतराने दोन हजारांच्या नोटाच व्यवहारातून गायब झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, तीन महिन्यांपूर्वी आरबीआयने दोन हजाराची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. पण, लोकांना त्यांच्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी किंवा बॅंकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली. आता ही मुदत ३९ दिवस शिल्लक आहे. सध्या ग्रामीणच्या तुलनेत शहरातील लोकांकडून जमा झालेल्या नोटांचे प्रमाण अधिक असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नोटा बदलून घेण्यासाठी लोकांना कोणताही फॉर्म भरून द्यावा लागत नाही. ओळखपत्र दाखवावे लागत नाही. आरबीआयने लोकांना नोट बदलण्यासाठी दररोज २० हजारांची (१० नोटा) मर्यादा घातली, पण खात्यात पैसे जमा करण्यासाठी मर्यादा नाही. फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा आरबीआयने नियुक्त केलेल्या बँकांमध्येच आहे. रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकांना फाटलेल्या नोटा बदलून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पैसे भरणे व काढण्यासंबंधी ‘आरबीआय’चा नियम आरबीआयच्या नियमांनुसार, तुम्ही एका दिवसात ५० हजार रुपये आणि वर्षभरात २० लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम तुमच्या खात्यात जमा करू शकता. तेवढीच रक्कम काढता देखील येते. पण, त्याहून अधिक रक्कम रोखीने जमा केली किंवा काढायची असल्यास तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड द्यावे लागते. तसेच तुमच्या बँक खात्यात दोन हजाराची नोट जमा केल्यानंतरही तुम्हाला हा नियम पाळावा लागेल. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवाय एका दिवसात दोन हजाराच्या २४ नोटा जमा करू शकता, परंतु त्याची मर्यादा ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक होताच, तुम्हाला त्यावेळी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड द्यावे लागेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages