Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला अर्बन बँकेंच्या वर्धापनदिनानिमीत्त महिलांसाठी गायन स्पर्धा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

 सांगोला अर्बन बँकेंच्या वर्धापनदिनानिमीत्त महिलांसाठी गायन स्पर्धा व विविध कार्यक्रमाचे आयोजन


सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला अर्बन बँकेंच्या २७ व्या वर्धापनदिनानिमीत्त महिलांसाठी कराओके गायन स्पर्धा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेंचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांनी केले आहे.
सांगोला वर्धापनदिनानिमीत्त सांगोला अर्बन बँक, रोटरी क्लब व इनरव्हिल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बँकेंच्या वर्धापनदिनानिमीत्त शुक्रवार दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते ५ वा, पर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला असून रक्तदात्यांना आकर्षक पाण्याचे जार व थर्मास भेट म्हणून देण्यात येणार आहे.
शनिवार दि. १२ ऑगस्ट २०२३ रोजी दु. २ वा. १८ वर्षापुढील मुली व महिलांसाठी कराओके गायन स्पर्धा कविराज मंगल कार्यालय, महुद रोड येथे आयोजित करण्यात आला असून विजेत्या प्रथम क्रमांकांस रु. ५०००/-, द्वितीय क्रमांकास रु.३०००/-, तृतीय क्रमांकास रु. २०००/- व २ उत्तेजनार्थ विजेत्यांस रु. १०००/- प्रत्येकी व ट्रॉफी देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेसाठी सौ. रत्नप्रभा माळी, रोटरी क्लब, (मो.९९२२००४१८०), सौ. सविता लाटणे, इनरव्हिल क्लब, (मो. ९९२१०१८६१८) व श्री. प्रसाद पाठक, सांगोला अर्बन बँक, (मो. ९७६४६४१९१९) यांचे कडे रु. ५०/- प्रवेश शुल्कासह नाव नोंदणी करावीत. रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी सायं. ५ वा. सांगोला अर्बन बँकेंच्या सभागृहात मिरज येथील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. चंद्रशेखर हळ्ळीगंळे यांचे तणावमुक्त जिवन व व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वा. बँकेंच्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण तसेच इ. १० वी व इ. १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुंणवत विद्यार्थ्याचा मा. प्रा. पी. सी. झपके सर, अध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून बँकेंचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार व नागरिकानी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा. एस. के. पाटील, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ. सविता लाटणे, बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए किसन माळी यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments