नविन शैक्षणीक धोरनात पालकांनीही जागृत राहणे काळाची गरज -प्रा स्वामिनाथ कलशेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

नविन शैक्षणीक धोरनात पालकांनीही जागृत राहणे काळाची गरज -प्रा स्वामिनाथ कलशेट्टी

 नविन शैक्षणीक धोरनात पालकांनीही जागृत राहणे काळाची गरज -प्रा स्वामिनाथ कलशेट्टी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जाणता राजा बहु शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी ता उत्तर सोलापुर  येथील सर्व शैक्षणीक  विभागातील  विदयार्थ्यांच्या पालक शिक्षक सहविचार सभा व गुणवंती विदयार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला  या प्रसंगी  प्रा कलशेट्टी बोलत होते .यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीमाता यांचे प्रतीमापुजन करुन कार्यक्रमाची सुरवाती झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा संजय जाधव , प्रमुख मार्गदर्शक जिजाऊ शिक्षण संकुल खांडवीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे  टीव्ही ९ चे रिपोर्टर सागर सुरवसे  संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ  विश्वस्त  योगेश निळ   प्राचार्या सुषमा निळ उपस्थित होते .. यावेळी सर्व विभागितील चारशेहुन अधीक पालक उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी प्रा कलशेट्टी यांनी  आजच्या बदलत्या युगात  पालकांनीही शिक्षणाबद्दल  जागृत राहने काळाची गरज आहे आपण अपडेट राहीलो तरच आपला पाल्यही  शैक्षणीक क्षेत्रात प्रगती करू शकेल बदलते युग लक्षात घेता आपण पालक  म्हणुन ज्ञानसंपन्न आपण व्हावे असे आव्हान प्रा कलशेट्टीयांनी केले. तर संभाजी घाडगे यांनी  आजच्या   आपल्या मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी जाणीवपुर्वक लक्ष दयावे आरोग्य हीच आपली संपत्ती आहे मुलांना  सकस  आहार दयावा तसेच संस्कार आपल्या मुलांनवर व्हावेत यासाठी आपण आपणही घरामधे ऐकमेकांचा आदर करावा मोबाईलपासुन  मुलांना दुर ठेऊन मैदानी खेळाकडे मूलांना आकर्षीत पालकांनी करावे   आपले मन, मनगट, मेंदु , मस्तक सशक्त करम्यासाठी शिक्षणाबरोबरच  मैदानी खेळही आवश्यक आहेत   असे मत व्यक्त केले तरसंस्थापक गणेश निळ  यांनी सर्व पालकांना विविध  विदयार्थ्याच्या शिष्यवृती बद्दल माहिती देऊन याचा पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले   अध्यक्षीय भाषणात प्रा जाधव यांनी  पालक शिक्षक संस्थापक विदयार्थी हीच देशाची पुढची सक्षम पीढी आहे  आपण सर्वाजन जागृत राहुन या  देशाची चांगली पीढी तयार करुयात असे   क्रातीदीनी आपण आपल्या पाल्याचे गुणगौरव  करुन त्याना भारत देशावर माझा आहे अशी भावना विदयार्थ्यांची झाली पाहिजे असे मत मांडले या प्रसंगी प्राचार्या सुषमा निळ  यांनी संस्थेच्या  विविध उपकृमाची माहीती पालकांना दीली. या प्रसंगी मधूकर निळ , सिताराम पाटील मुख्याध्यापीका अर्चना औरादे उपस्थीत होते   तर कार्यक्रम यशस्वी करनेसाठी प्रा विश्वनाथ उपाध्ये प्रा रवी कौतकौंडे संकेत मोरे , माऊली भोसले, मिरा माने अश्वीनी निळ ,प्रियंका निळ,तेजस्विणी कुलकर्णी ,प्राजक्ता पाटील,ऋती मकाशे. यांमी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  प्रा जाधव यांनी केले तर आभार असमा सय्यद यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages