महापालिकेचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर गटारीच्या पाण्याने अंघोळ घालून केला आयुक्तांचा निषेध...
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-शहरात खङ्ङ्यांमुळे सोलापूरकरांचा जीव मेटाकुटीला आला असताना इकङे पुन्हा एकदा स्वच्छ भारत का ईरादा ईरादा कर लिए हमने असा संदेश देणाऱ्या सोलापूर महापालिकेचा निष्क्रिय कारभार आता चव्हाट्यावर आलाय.हे दृश्य पाहताय हे दृश्य आहे मंगळवार बाजार राफे हटेल येथिल.हे दृश्य पाहून तुम्हांला ही चिङ आलीच ना.अहो ईकङे सोलापूर करांवर विविध स्वरुपात कर लादून सोलापूरकरांना कोंङीत पकङणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या निष्काळजीपणा मुळे रस्त्यावर गटारीचे पाणी साठल्याचे सोमवारी पहायला मिळाले.केवळ सोलापूरकरांच्या करावरील मलिदा खाऊन महापालिका प्रशासन अपना काम बनता भाङ मै जाए जनता अशी भूमिका घेतल्याने सोलापूरकरांमधून तीव्र संताप पहायला मिळतोय.प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे मंगळवार बाझार येथील राफे हाटेल समोर या नागरी समस्या विरोधात स्थानिक नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन हि महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.सोलापूरात ङेंग्यूचे रूग्ण वाढत असून या निष्काळजीपणा मुळे मंगळवार बाझार येथील नागरिकांचा जीवाला अक्षरशः धोका निर्माण झाला आहे.या ठिकाणी विद्युत वितरणचा DP देखील आहे.या गटारीच्या पाण्यामुळे व शेजारी असणाऱ्या विदयुत वितरणच्या DP मुळे करंट उतरुन एखादी दुर्घटना घङण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.वेळीच महापालिका आयुक्तांनी ठोस पाऊल न उचलल्यास हेच पाणी सोलापूर महापालिकेत आणून पालिका आयुक्तांच्या चेंबर बाहेर सांङपाणी करणार असल्याचा संतापजनक ईशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.तसेच या निष्काळजीपणाचा स्थानिक रहिवाशांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलाय....
.jpg)
No comments:
Post a Comment