आ बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे 25 ते 29 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदान करावे
माढा (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-चेअरमन तथा माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांच्या 1 सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त माढा तालुका व विधानसभा मतदारसंघातून 5 हजार बाटल्या रक्त संकलानाचा संकल्प केला असून हा संकल्प साध्य करण्यासाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर,बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज तुर्क-पिंपरी,विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ,माढेश्वरी बँक सांस्कृतिक मंडळ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग माढा व तालुक्याच्या पूर्व भागातील विविध ठिकाणी 25 ते 29 ऑगस्ट 2023 या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून गावोगावचे कार्यकर्ते,युवक व इच्छुकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.
मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंजनगाव खेलोबा येथील मंदिर परिसरात 25 ऑगस्ट रोजी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून या ठिकाणी मानेगाव,धानोरे देवी,खैराव,बुद्रुकवाडी,कापसेवा डी, हटकरवाडी,पाचफुलवाडी,अंजनगाव खेलोबा,कुंभेज,लोंढेवाडी या ठिकाणच्या इच्छुकांनी रक्तदान करावे. 27 ऑगस्ट रोजी दारफळ सीना येथील आंबेडकर भवन,उपळाई खुर्द येथील प्राथमिक शाळा,उंदरगाव येथील प्राथमिक शाळा व उपळाई बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजन केले असून या ठिकाणी दारफळ सीना,निमगाव (मा.), राहूलनगर,अंजनगाव उमाटे, जामगाव,वडाचीवाडी (अं.उ),उपळाई खुर्द,खैरेवाडी,उंदरगाव,वाकाव, उपळाई बुद्रुक,बोकडदरावाडी येथील इच्छुकांनी रक्तदान करावे.29 ऑगस्ट रोजी केवड येथील ग्रामपंचायत कार्यालय व माढा येथील डॉ.पाटील हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीर आहे तेथे केवड,चव्हाणवाडी,जाधववाडी, शिंदेवाडी,महातपूर,रणदिवेवाडी, वडशिंगे व वेताळवाडी येथील इच्छुकांनी रक्तदान करावे असे त्यांनी सांगितले आहे.ही रक्तदान शिबीरे यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,मार्केट कमिटीचे संचालक,खरेदी विक्री संघाचे संचालक,कारखान्याचे संचालक,माढेश्वरी बँकेचे संचालक,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,गावोगावचे सरपंच व उपसरपंच,विकास सोसायटीचे चेअरमन व व्हा.चेअरमन यांनी मनापासून प्रयत्न करावेत असे आवाहन चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.
.png)
.png)
No comments:
Post a Comment