Hot Posts

6/recent/ticker-posts

* संभाजी भिडे खोटे बोलतात हे आधी सिद्ध करा.!

 * संभाजी भिडे खोटे बोलतात हे आधी सिद्ध करा.!

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्माचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून सांगणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरु लागली आहे. नुकतेच तुषार गांधी यांनीसुद्धा भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संभाजी भिडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याआधी ते पुस्तकाच्या माध्यमातून जे महात्मा गांधी यांच्या जन्माविषयी सांगितले ते खोटे आहे हे सिद्ध करावे लागेल किंवा हेतूपुरस्पर मुद्दामाने महात्मा गांधींचा अपमान केला हे सिद्ध करावे लागेल आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांना करावी लागेल. जर भिडे यांचे वक्तव्य खरे असेल किंवा त्यांनी सांगितलेले महात्मा गांधीजींचा इतिहास सत्य असेल तर ते सत्य आपल्याला स्वीकारणे गरजेचे आहे. कारण सत्य हे सत्य असते. हे आज ना उद्या बाहेर येणार असते आणि ते कधीही लपून राहत नसते. त्यामुळे महात्मा गांधीजींचा अपमान करण्याचा उद्देश मनात ठेवून भिडे यानीं जर ते वक्तव्य केले असेल तर तो निश्चितच गुन्हा आहे परंतु घडलेला सत्य इतिहास लोकांसमोर मांडणे, जनतेला सांगणे हे मात्र गुन्हा होऊ शकत नाही. ज्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन भिडे यांनी ते वक्तव्य केलेले आहे त्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल कोणी का नाही बोलत? गुन्हा तर त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे ज्यांनी हा इतिहास लिहिला. ज्यांनी ते वाचून दाखविला त्याच्यावर गुन्हा दाखल करणे अत्यंत चुकीचे आहे असे मला वाटते. त्यामुळे इतिहास जर सत्य असेल तर ते आपण स्वीकारले पाहिजे किंवा संभाजी भिडे हे खोटे बोलत आहे हे आपणाला सिद्ध करावे लागेल आणि मगच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल.

Reactions

Post a Comment

0 Comments