शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने माढा तहसीलसमोर हलगीनाद आंदोलन,अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी शिवसेनेचे हालगीनाद आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने माढा तहसीलसमोर हलगीनाद आंदोलन,अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी शिवसेनेचे हालगीनाद आंदोलन

  शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने माढा तहसीलसमोर हलगीनाद आंदोलन,अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी शिवसेनेचे हालगीनाद आंदोलन 


माढा (कटूसत्य वृत्त):-माढा तहसील कार्यालयासमोर अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी माढा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरच हालगीनाद आंदोलन करण्यात आले माढ्यात रस्त्याचे काम करीत असताना अवैध रीत्या  मुरुम उत्खनन करण्यात आले असुन त्या उत्खनन केलेल्या संबंधित ठेकेदारांवर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख भैय्या खरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. सकाळी ८.३० वाजता सुरु झालेले आंदोलन दुपार पर्यंत सुरुच होते.ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१० ते १७  जुलै या कालावधीत माढ्यात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात अवैधरित्या झालेल्या उत्खननाबाबत लेखी  कारवाई  करण्याच्या मागणीचे  निवेदन शिवसेना व युवा सेनेच्या वतीने तहसीलदार व सा.बा.विभागास देण्यात आले होते.  त्यानंतर बांधकाम उपविभाग, कुर्डुवाडीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मुरूम उत्खनन झालेल्या स्थळाला भेट देऊन चौकशी करून संबंधित ठेकेदार व  वाहन मालकावर कारवाई करू  असे आश्वासित केले. परंतु एक महीना होऊन गेला तरी  देखील सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कुर्डुवाडी व तहसिलदार कार्यालय, माढा यांनी संबंधित ठेकेदारांवर वर कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने  हालगी नाद आंदोलन केले. आंदोलन स्थळाला तहसीलदार विनोद रणवरे,नायब तहसीलदार विजय लोकरे यांनी भेट देऊन चर्चा केली मात्र कठोर कारवाई  झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला होता. कुणालाही पाठिशी घातले जाणार नसुन निश्चितच भ्रष्ट कारभार केलेल्यावर कारवाई करु असे ठोस आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन स्थगित केले.यावेळी शहर प्रमुख भैय्या खरात,युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यम लोंढे,स्वप्निल खरात यांचेसह शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी व शहरातील नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages