Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्य लेखा व वित्त अधिकारी, वाकडेंनी स्वीकारला पदभार

 मुख्य लेखा व वित्त अधिकारी, वाकडेंनी स्वीकारला पदभार


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी मिनाक्षी वाकडे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांनी बुधवारी (ता.२३) पदभार स्वीकारला. तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. वाकडे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेला पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.

वाकडे या उपळाई (ता.माढा) येथील असून, त्यांनी काही महिने बार्शी नगरपरिषदेत सेवा केली आहे. तत्कालीन मुख्य वित्त व लेखाधिकारी पवार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर उत्तम सुर्वे यांच्याकडे प्रभारी जबाबदारी देण्यात आली होती.

सुर्वे यांची पदोन्नतीवर बदली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखाधिकारीपदी झाली आहे. सोलापूरला अधिकारी नसल्याने सुर्वे यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता वाकडे यांच्या रूपाने पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने सुर्वे यांना जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments