Hot Posts

6/recent/ticker-posts

'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमांतर्गत कुरुलच्या चिमुकल्यांनी पाठविल्या जवानांना राख्या

 'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमांतर्गत कुरुलच्या  चिमुकल्यांनी पाठविल्या जवानांना राख्या


 कुरुल (कटूसत्य वृत्त):- बहिण भावाच्या नातं अतूट करणारा रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाच्या पार्श्वभूमीवर कुरुल जिल्हा परिषद केंद्र शाळेतील चिमुकल्यांनी देश सेवेसाठी कर्तव्यावर असणाऱ्या जवानांसाठी 'एक राखी सैनिकासाठी' या उपक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टाद्वारे  राख्या पाठविल्या आहेत.

 मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील सुमारे १२० जवान देशसेवेसाठी वेगवेगळ्या भागात आहेत. या जवानांना वेगवेगळे सण आणि उत्सव क्वचितच साजरे करायला मिळतात. सुट्टीच्या निमित्ताने ते गावी आल्यानंतरच आपल्या सणांमध्ये ते सहभागी होऊ शकतात. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना अनेक सण उत्सवाला मुकावे लागते.
 दरम्यान भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन. येत्या ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा होणार आहे. मात्र सीमेवर कार्यरत असणाऱ्या अनेक युवकांना हा सण साजरा करता येत नाही. त्याच अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ५०० राख्या स्पीड पोस्ट करून  जवानांना पाठवल्या आहेत.
 यावेळी मुख्याध्यापक तुकाराम मुचंडे, सचिन शिंदे, रामचंद्र लांडे, समाधान गोर्धनकर, हजारे, अनुराधा सोनवणे, स्मिता लामतुरे, सुवर्णा तोरखडे आधी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments