सोलापूरात' एमआयटी शिक्षणसंस्था समूहा'च्या "विश्वप्रयाग विद्यापीठाचा" शुभारंभ...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

सोलापूरात' एमआयटी शिक्षणसंस्था समूहा'च्या "विश्वप्रयाग विद्यापीठाचा" शुभारंभ...!

 सोलापूरात' एमआयटी शिक्षणसंस्था समूहा'च्या "विश्वप्रयाग विद्यापीठाचा" शुभारंभ...! 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रच नव्हे तर देश-विदेशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून माईर्स्   एमआयटी शिक्षण संस्थेने  शिक्षण,  प्रशिक्षण,  आणि संशोधन क्षेत्रामध्ये नेत्र दीपक प्रगती केली आहे. 

गेल्या 40 वर्षापासून देशातील तरुण पिढी घडवण्यासाठी हे संस्था अहोरात्र प्रयत्न करत असून त्याच्याच  धरतीवर सोलापुरात एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या वतीने विश्व प्रयाग विद्यापीठाचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती एमआयटी पुणे शिक्षण समूहाच्या महासचिव आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा स्वाती चाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी बोलताना चाटे पुढे म्हणाले की, माईर्स् एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड  यांच्या अद्वितीय संकल्पनेतून आणि नियोजनातून साकारलेली एमआयटी ही संस्था पुण्यामध्ये 40 वर्षांपूर्वी स्थापन झाली. सध्या या संस्थेच्या समूहांतर्गत चार विद्यापीठे विश्वराज बाग पुणे येथे एमआयटी आर्ट्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे येथे डॉ विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, उज्जैन ,मध्य प्रदेश या ठिकाणी अवंतिका युनिव्हर्सिटी  आणि शिलाँग मेघालय येथे एमआयटी तंत्रज्ञान विद्यापीठ सध्या कार्यरत आहे. 

त्याचबरोबर वैद्यकीय ,अभियांत्रिकी,  व्यवस्थापन शास्त्र,  नौका,  अभियांत्रिकी,  तंत्रनिकेतन ,औषध निर्माण,  शिक्षण शास्त्र,  कला,  वाणिज्य,  विज्ञान व संशोधन,  कायदा डिझाईन,  स्कूल ऑफ गव्हर्मेंट गुरुकुल,  विश्वशांती संगीत कला  अकादमी,  सीबीएससी माध्यम प्रशाला अशा विविध शैक्षणिक शाखांच्या 63 संस्थांमधून सुमारे 64 हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेत असल्यासही त्यांनी यावेळी सांगितलं. 

शिक्षण व संशोधन हा केंद्रबिंदू मानून शास्त्रोक्त समृद्ध आणि उद्दिष्ट पूर्ण शिक्षण देणे हेच या संस्थेचे ध्येय असल्यामुळे ज्ञानदानाच्या उद्दिष्ट कृतीसाठी खेड्यापाऱ्यापर्यंत ज्ञानाची दारं खुली व्हावीत याच उदात्त हेतूने भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानावर आधारित आणि गुरु शिष्य परंपरेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेने क्षार तपाच्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये नेत्र दीपक प्रगती केलेले आहे. 

शिक्षण क्षेत्रातील 40 वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा पुढे नेत माइर्स एमआयटी शिक्षण समूहाच्या माध्यमातून सोलापूर येथे एमआयटी विश्व प्रयाग विश्व विद्यालयाची सुरुवात यंदापासून महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेनुसार करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

सोलापूर परिसरातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान ,माहिती तंत्रज्ञान  इन्फ्रास्ट्रक्चर असलेली सुसज्ज सव्वा दोन लक्ष स्क्वेअर फुटाची इमारत विश्वप्रयाग विद्यापीठात उभारलेले असून काही दिवसात मान्यवरांच्या शुभहस्ते या विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा होणार असल्याचं शेवटी बोलता प्रा.  स्वाती  चाटे यांनी सांगितलं.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages