सोलापूर शहर जिल्हाध्यक्षचा निर्णय दोन दिवसात घेणार- नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई(कटूसत्य वृत्त):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवसस्थानी सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱी यांची महत्त्वाची बैठक अजित पवार सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे निरीक्षक सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीत सोलापूर शहरातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यात आला सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी संतोष पवार जुबेर बागवान किसन जाधव हे इच्छुक असून यांची मते अजित पवार व सुनील तटकरे यांनी जाणून घेतली तसेच शहरातील विधानसभा तसेच महापालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी संतोष पवार जुबेर बागवान किसन जाधव शफीभाई इनामदार सुहास कदम वसिम बुरान आनंद मुस्तारे यांनी आपली मते मांडाली तब्बल पंचेचाळीस मिनिट सर्वाचे ऐकून घेतल्यानंतर अजित पवार यांनी दोन दिवसात सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष निवडला जाईल सर्वानी एकत्रित काम करावे असे सांगितले
या बैठकीस संतोष पवार शफीभाई इनामदार,किसन जाधव, नागेश गायकवाड,जुबेर बागवान,वसीम बुरान, सुहास कदम,आनंद मुस्तारे,प्रमोद भोसले, चेतन गायकवाड,खलील शेख आदी उपस्थित होते

No comments:
Post a Comment