सरकार बदलतंय रंग ...! जनतेचा लय मोठा अपेक्षाभंग..!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वातावरणानुसार आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी सातत्याने रंग बदलणारा प्राणी म्हणून सरड्याची ओळख..! या प्राण्यांप्रमाणेच सद्यस्थितीमध्ये केंद्रामध्ये असणार मोदी सरकार आणि राज्यांमध्ये असणार ट्रिपल इंजन सरकार सातत्याने आणि वातावरण बघून स्वतःचा रंग बदलू लागल्यामुळे आमच्या फार मोठ्या अपेक्षांचा भंग होऊ लागला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सध्या गावागावांमधून उमटताना दिसत आहेत. सद्यस्थितीमध्ये राजकीय वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढत असून रोज याचे नवनवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. आरोप झाला की त्यावर प्रत्यारोप हे कुठपर्यंत चालणार..? वार आणि पलटवार हे कधी थांबणार..? गतिमान विकासाची एक्सप्रेस धावणार..? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्यामुळे भाजपा पुन्हा एकदा निवडणुका जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आटोकाट प्रयत्न करताना दिसू लागली आहे. आणि त्यामुळे अनेक आश्वासनाचा पाऊस पाडून मागच्या आश्वासनाचा रंग बदलू लागली आहे.मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्याच्या निवडणुकीला अजून बराच कालावधी शिल्लक आहे तरीसुद्धा भाजपा या ठिकाणी उमेदवारी जाहीर करून एक प्रकारे विकास प्रश्न बाजूला ठेवून फक्त निवडणुकांभोवतीच या देशाचे चक्र नुसतच फिरवत आहे परंतु निवडणुका मात्र लांबणीवर टाकत असल्याचे सध्या दिसू लागलेले आहे. सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यकाळ संपला तरी सुद्धा या निवडणुका झालेल्या नसून या ठिकाणी प्रशासक काम करू लागल्यामुळे विकास कामांना ब्रेक लागला आहे तो ब्रेक कधी निघणार..? असा प्रश्न सध्या नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात विचारला जातोय. केवळ नरेंद्र मोदी हे नाव किंवा फोटो वापरून निवडणुका जिंकण्याचे दिवस आता नामशेष होऊ लागल्यामुळेच भाजपाला मोठ्या प्रमाणात रणनीती मोर्चे बांधणी करावी लागत असल्याचे दिसत आहे. भाजपाला कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशामध्ये मतदारांनी नाकारल्यामुळे भाजप आता दूध पडल्यानंतर ताक सुद्धा फुंकून पिऊ लागलेले आहे. निवडणुका लागण्यापूर्वीच उमेदवार जाहीर करून तेथील उमेदवारांना वातावरण निर्मिती करता यावी हेच भाजपाचे बचाऊ आणि रंग बदलणार धोरण आहे अशीही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने मतदार राजाला अनेक मोठमोठी स्वप्ने दाखवली होती परंतु त्या स्वप्नांचा या सरकारच्या कार्यकाळामध्ये पूर्णपणे चक्काचूर झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुका भाजपासाठी सोप्या नाहीत हेच सध्या त्यांच्या नेत्यांना कुठेतरी जाणवू लागल्यामुळेच ते फोडाफोडीचे राजकारण सुद्धा मोठ्या राजरोसपणे करू लागल्याचे चित्र देशभर दिसू लागलेले आहे. राजस्थान आणि छत्तीसगड या ठिकाणी मतदार पुन्हा एकदा बदल करण्याच्या मूडमध्ये असल्यामुळे भाजपाला नवनवीन धोरणे आखून जनतेची दिशाभूल करून नवनवे रंग राजकारणात भरावे लागत असल्याचे दिसत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना मतदार राजाच्या माथ्यावर मारून निवडणुका जिंकता येऊ येथील याच भाबड्या आशेवर सध्या भाजपा काम करत असून प्रगती आणि विकास याला मात्र कुठेच प्राधान्य दिले जात नाही. फक्त आरोपाच्या फैरी मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहेत. सामान्य जनतेचे प्रश्न संसद किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनात सुटू शकत नाहीत. सामान्य जनतेकडे लक्ष द्यायला या राजकारण्यांना वेळच नसून फक्त एकमेकांवर चिखल फेक करण्यामध्येच हे राजकीय नेते मोठ्या प्रमाणात धन्यता मानू लागले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी इंडिया आघाडी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागले असून इंडिया आघाडी मजबूत झाल्यानंतर निश्चितपणे मोदी सरकारला फटका बसेल असे राजकीय विश्लेषकातून बोलले जात आहे.इंडिया आघाडीमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाल्यास आणि असणारी कटूता संपुष्टात आल्यास निश्चितपणे इंडिया आघाडी चमत्कार करेल असेही नागरिकांमधून बोलले जात आहे.समोर शत्रू प्रबळ असताना त्याच्या विरुद्ध लढताना सैन्याची एकजूट झाली पाहिजे आणि तशी एकजूट जर इंडिया आघाडीने केली तरच त्यांना रणांगणावर विजयी चौकार मारता येईल.
.jpg)
No comments:
Post a Comment