शहीद राजगुरु यांच्या जन्मदिनी युवा महासंघाचे बेरोजगारी विरोधात आंदोलन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

शहीद राजगुरु यांच्या जन्मदिनी युवा महासंघाचे बेरोजगारी विरोधात आंदोलन.

 शहीद राजगुरु यांच्या जन्मदिनी युवा महासंघाचे बेरोजगारी विरोधात आंदोलन.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आपल्या देशातील बेरोजगारी आज एखाद्या साथीच्या आजारासारखी पसरलेली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या नोंदीनुसार आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे आणि ती महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.आपला देश आणखीण मोठ्या आर्थिक मंदीतून जात आहे. याला  सरकारची धोरणे व कृती ही कारणे आहेत. अशी टीका युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी केली.

24 ऑगस्ट 2023 रोजी शहीद राजगुरु यांच्या जयंतीदिनी वाढत्या बेरोजगारी विरोधात  बेरोजगार युवकांच्या विविध मागण्यांसंदर्भात डी.वाय.एफ.आय. च्या व सोलापूर जिल्हा समिती च्यावतीने जिल्हा परिषद पुनम गेट येथे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या बेरोजगारी विरुद्ध आंदोलन करण्यात आले तदनंतर शिष्टमंडळाद्वारे निवासीउपजिल्हाधिकारी मा. शमा पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 आज बड्या औद्योगिक घराण्यांना देशाला सहजपणे लुटता यावे, याची सोय करण्यात सरकार मग्न आहे. सुशिक्षित बेरोजगारी वाढली आहे. उपलब्ध असलेल्या नोकऱ्या त्यांचे स्वरूप बदलत आहेत, त्या कायमस्वरूपी ते तात्पुरत्या स्वरुपात बदलत आहेत. कंत्राटी कामांत पगार तुटपुंजा आहेच, शिवाय कधीही कामावरून काढून टाकण्याची टांगती तलवार डोक्यावर आहे. कंत्राटीकरण व खाजगिकरणाने सर्व सीमा ओलांडल्या असून युवा वर्गाचे आयुष्य त्यांनी उध्वस्त केले आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने तलाटी भरतीसाठी 4466 जागांची जाहिरात काढली. त्यासाठी 13 लाख पेक्षा जास्त अर्ज भरले गेले आणि 1000 रूपये फी आकारली गेली. आज प्रत्यक्ष परिक्षा केंद्रावर सर्व आणि विस्कळीत नियोजनाचा अभाव असल्याने परीक्षार्थी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरळीत करावी प्रत्येक परिक्षेसाठी फक्त 100 रूपये फी आकारून बाकीची रक्कम परत करावी. परिक्षा केंद्र स्थानिक पातळीवर करण्यात यावे जेणेकरून गैरसोय आणि आर्थिक ताण पडणार नाही. अशी मागणी युवा महासंघाच्या वतीने  यावेळी करण्यात आली.

या सर्व गोष्टींचा विचार करून डि वाय एफ आय महाराष्ट्र या युवा संघटनेनी ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच शहीद राजगुरु यांच्या जयंती दिनी संपूर्ण महाराष्ट्रात  बेरोजगारीविरुद्ध आंदोलन करीत करीत आहे. मागण्याचे निवेदन शमा पवार उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, उपाध्यक्ष अशोक बल्ला, कादर शेख, कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्ल्हाळ, अप्पाशा चांगले, राहुल बुगले, पुष्पा गुरुपनवरू आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages