अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवीत केले वृक्षारोपण
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने अतुल चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग ,पुणे यांच्या प्रेरणेने व संजय माळी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांच्या हस्ते बुधवार दि 23 ऑगस्ट 2023 रोजी अकलूज ,महाळुंग, बोरगाव, माळखांबी ,तोंडले बोंडले ,रस्ता प्रजीमा 93 किमी भाग अकलूज ते महाळुंग शून्य ते 7/400 या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक, सागर मस्के उपअभियंता एल टी डाके, श्याम कास्ते उबाळे आधी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे अधिकारी उपस्थित होते झाडे लावा झाडे जगवा या धोरणानुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय मदतीविना निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवीत श्री संत सोपान काका पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व वाढत चाललेले जागतिक तापमान या गोष्टी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पालखी महामार्गावर वृक्षारोपण केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे
निसर्गाकडून आपण अनेक गोष्टी घेत असतो परंतु आपणही त्याला काहीतरी देणं लागतो या भावनेतून अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी महामार्गावर वृक्षारोपण केले असून यापुढेही या विभागामार्फत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण केले जाणार आहे या वृक्षारोपणात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनाही सहभागी करून घेऊन या वृक्षाचे संगोपन कसे केले जाईल यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सहकार्य करेल .
-सुनिता पाटील ,कार्यकारी अभियंता सा बा विभाग अकलूज
.png)
No comments:
Post a Comment