जागा एक..! सिंह दोन..!! 'रण ' जिंकून ' जीत ' होणारा " सिंह" कोण..? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

जागा एक..! सिंह दोन..!! 'रण ' जिंकून ' जीत ' होणारा " सिंह" कोण..?

 जागा एक..! सिंह दोन..!! 'रण ' जिंकून ' जीत ' होणारा " सिंह" कोण..?


सोलापूर (दादासाहेब नीळ):- लोकसभेचे रणांगण जिंकण्यासाठी भाजप आणि कंबर कसली असली तरी सुद्धा माढ्याचा तिढा भाजपाला सुटणार कसा..?
असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जातो आहे. सर्व पक्षांच्या गटबाजी बरोबरच आता भाजपमध्ये सुद्धा गटबाजीचा धुराळा मोठ्या प्रमाणात उडू लागलेला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाने मोहिते पाटलांना फोडून ताब्यात घेतला. मोहिते पाटील बंधूने निष्ठेने प्रामाणिकपणे प्रयत्न करून एक लाखाचा लीड आपल्या मतदारसंघातून बोलल्याप्रमाणे भाजपाला देऊन टाकला. परंतु भाजपाने मात्र मोहिते पाटील यांना कामापुरताच मामा याप्रमाणे वापरून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा माढा लोकसभा निवडण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलं असून आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी अकलूजचे रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा दंड थोपटले आहेत. त्यामुळे खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या राजकीय विरोधकांनी शत्रूचा शत्रू आपला मित्र हा फार्मूला वापरून राजकीय गोळा बेरीज करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने भाजप कोणाला उमेदवारी हा प्रश्न सध्या महत्त्वाचा मानला जातो आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यामुळेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला माढा मतदारसंघ केवळ फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपाला मागच्यावेळी मिळाला.
दिल्लीत जरी भाजपा आणि राज्यात जरी भाजपा असली तरी सुद्धा  मला लोकसभा मतदारसंघांमध्ये मात्र भाजपाचे बळ कुठेही दिसत नाही. केवळ थोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब भाजपाने केल्यामुळेच भाजपाला विजयश्री खेचून आणता येते हे आता सर्व पक्षांच्या लक्षात आल्यामुळे यंदाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे लक्ष लागले आहे.
गटातटाच्या राजकारणाचा फायदा मागच्या लोकसभेला भाजपला झाला असला तरी यावेळी सुद्धा भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पाडल्यामुळे पुन्हा एकदा विजयाचा सोपान चढणे भाजपा ला सोपे वाटत असली तरी लोकशाहीचा धागा असणारा मतदार राजा कधी आणि केव्हा कोणाला  कल देईल हे मात्र आज सांगता येत नाही. विशेष म्हणजे 2014 च्या मोदी लाटेत सुद्धा माढा लोकसभेची जागा भाजपाला जिंकता आली नव्हती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवून ही जागा खेचून आणली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर माढा लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी वनवे झाला अशी चर्चा होत असली तरी सुद्धा पक्षांतर्गत असलेल्या मतभेद आणि मनभेद भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला,  माळशिरस,  माढा,  करमाळा आणि सातारा जिल्ह्यातील फलटण,  मा ण, आणि खटाव आधी सात विधानसभा असलेला हा विस्तृत  माढा लोकसभा मतदारसंघ आहे.
आजच्या घडीला भाजपासाठी सर्वच विधानसभा मतदारसंघात वातावरण चांगलआहे.  कारण दोन विधानसभा वगळता सगळीकडे भाजपाचे लोकप्रतिनिधी किंवा मित्र पक्षाचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे येणारे लोकसभेला माढा रणांगण वनवे होणार अशी चर्चा होऊ लागलेली आहे.
विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर पुन्हा एकदा तालमीत उतरले असून त्यांनी शड्डू ठोकला आहे परंतु त्यांच्यासमोर दुसऱ्या आखाड्यातला पैलवान नसून त्यांच्याच आखाड्यातला पैलवान माळशिरस च्या मोहिते पाटील यांच्या रूपाने रणजीत सिंह , आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे भाजपासाठी सध्या घर का भेदी लंका ढाल असे वातावरण तयार झाले आहे. ज्या मोहिते पाटलांच्या कृपेमुळे लोकसभा जिंकता आली त्याच मोहिते पाटलांच्या विरोधात उभा राहण्याचे धाडस रणजीत सिंह निंबाळकर करणार का याकडे सुद्धा पाहिले जात आहे.
त्यात माढा तालुक्याचे विद्यमान आमदार बबन दादा शिंदे यांनी खासदार निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यात जाऊन दोन लाखाचे मताधिक्य देणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना विरोध होत असून सोलापूर जिल्ह्यातून रणजीत सिंह मोहिते पाटला नाही विरोध होऊ लागल्याने भाजपा पक्षश्रेष्ठी कोणत्या रणजीत सिंहाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार ...?याकडे  आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दोन्हीही रणजीत सिंह समर्थकांमध्ये आमचाच रणजीत माढ्याचा खासदार होणार अशा प्रकारचं युद्ध सोशल मीडियावर आतापासूनच सुरू झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages