विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुस्कारबाबत आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 30, 2023

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुस्कारबाबत आवाहन

 विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या


माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना विशेष गौरव पुस्कारबाबत आवाहन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-, जिल्हयातील  इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या  तसेच आयआयटी, आयआयएम, एम्स अशा ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, पत्नी यांच्या पाल्यांना 10 हजार रुपये व 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात  येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी याबाबत 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू, विविध साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक त्यांच्या पत्नी व पाल्य यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे (दुरध्वनी क्रमांक 0217-2992366) संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages