सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-शासन परिपत्रक दि.26 सप्टें.2012 अन्वये, जिल्हास्तरीय लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या दिवशी जनतेच्या तक्रारी गाऱ्हाणी ऐकण्याकरीता त्या त्या विभागातील विभागप्रमुखांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
तरी माहे सप्टेंबर 2023 चा लोकशाही दिन दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केला असून , सर्व विभाग प्रमुखांनी आपलेकडील मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन / अर्ज माहिती अधिकार अधि. 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज , आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही इ. माहितीसह सकाळी 10 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता, सोलापूर येथे उपस्थित रहावे . तसेच या दिवशी गैरहजर राहणार असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी कळवले आहे.
.jpg)
0 Comments