अरण येथे निसर्गचित्र स्पर्धा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

अरण येथे निसर्गचित्र स्पर्धा संपन्न

 अरण  येथे निसर्गचित्र स्पर्धा संपन्न

अरण (कटूसत्य वृत्त):- हरिभाऊ नाना शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशन ने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निसर्गचित्र चित्रकला स्पर्धेमध्ये खुल्या गटात प्रथम क्रमांक निकिता संजय नलवडे, संत सावता माळी विद्यालय अरण, द्वितीय क्रमांक हर्षदा अमोल थोरात श्री उमा विद्यालय मोडनिंब,आरती प्रभाकर वसेकर संत सावता माळी विद्यालय अरण,वैष्णवी सुनील खटके संत सावता माळी विद्यालय अरण, अनुराधा मुकेश शिंदे संत सावतामाळी विद्यालय अरण साक्षी बालाजी वाकडे महाराणी लक्ष्मी प्रशाला उपळाईलहान गटात
काजल विष्णू जगताप संत सावतामाळी विद्यालय अरण, कृष्णाली प्रशांत पाटील जि प प्रा शाळा पडसाळी, रुद्र परमेश्वर माळी जि प प्रा शाळा वैरागवाडी,  शशांक सतीश घाडगे जिप शाळा अरण, करण हनुमंत रोकडे संत सावता माळी विद्यालय अरण,श्रावणी संतोष वरकुटे संत सावता माळी विद्यालय यांनी क्रमांक मिळवले आहेत. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन किसन आप्पा जाधव यांच्या हस्ते व बाबासाहेब सोलंकर,भारत आबा शिंदे, रावसाहेब पाटील,रमेश पाटील, कवी सावता घाडगे व दिनानाथ घाडगे यांच्या करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी प्राचार्य यशवंत शिंदे सर, शिवाजी टोणपे बापू, प्रतापराव पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत दादा शिंदे, माजी प्राचार्य उत्तमराव सावंत, प्राचार्य सुरेश मोरे स्पर्धा प्रमुख सावता घाडगे अनिल गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले.चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सुहास गायकवाड, संदीप शहा व महादेव थोरात या कला शिक्षकांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संत सावतामाळी विद्यालय अरण येथील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages