मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास होणार कारवाई "अकलूज पोलिस ठाण्यात भादवि कलम 336 प्रमाणे 9 गुन्हे दाखल"
अकलूज (कटूसत्य वृत्त):- मोबाईलवर बोलत वाहन चावणाऱ्या चालकांवर दोन दिवसात भादवि कलम 336 प्रमाणे 9 गुन्हे अकलूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
अकलूज पोलिस ठाण्या कडून मिळालेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांचे अधिपत्याखाली अकलुज पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चालवत असताना, मोबाईल फोनवर बोलून स्वतःचे व इतर लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशारितीने वाहन चालवणारे वाहन चालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मोटार सायकल चालवणारे वाहन चालकांवर दोन दिवसात भादवि कलम 336 प्रमाणे 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यापुढेही अशा प्रकारची कारवाई चालूच राहणार असल्याचे अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड म्हणाले. तसेच विना लायसन्स, विना नंबर प्लेट, विना लायसन्स, फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहन चालवणे, वाहनांचे सायलन्सर बदलून वाहन चालविणे यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.तर अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास न देण्याबददल अवगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, डॉ. सई भोरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

0 Comments