राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदार नियुक्तीचे घोंगडं किती दिवस भिजत पडणार..?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सातत्याने भूकंप होत आहेत. गेल्या चार वर्षापासून राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदाराच्या नियुक्तीचा विषय आजही रेंगाळत पडला आहे. मूळ शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर हा प्रश्न सुटेल अशी आशा होती परंतु अजूनही हा प्रश्न प्रश्नच राहिल्यामुळे न्यायालय आपली भूमिका कधी मांडणार याकडे लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडी सरकार आले आणि गेले. शिंदे फडणवीस आणि पवार असे त्रिसूळ सरकार सध्या राज्याच्या सत्तेवर अधिराज्य गाजवीत आहे. सत्तेची सूत्रे या त्रिशूल सरकारकडे असून सुद्धा हा प्रश्न चार वर्षापासून भिजत पडलेला आहे. त्यामुळे राज्यपाल कोट्यातून आमदार होऊ इच्छिणाऱ्यांच्या पदरी वेट अँड वॉच ची भूमिका गेल्या चार वर्षापासून असल्यामुळे आणि पुन्हा हा प्रश्न न्यायालयामध्ये गेल्यामुळे आमदार होण्यासाठी बाशिंग बांधलेल्या उमेदवारांना या टर्ममध्ये तरी आमदार होता येणार..? ही पाच वर्ष अशीच जाणार..?
असा प्रश्न आमदारांच्या समर्थकांमधून मोठ्या प्रमाणात विचारला जातो आहे.
तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी 12 आमदारांना न्याय देऊ असे सांगितले होते.
परंतु महापुरुषांविषयी केलेल्या निंदनीय वक्तव्यामुळे भगतसिंग कोषारी यांना राज्यपाल पदावरून हटवून भाजपाने रमेश भैस यांची नियुक्ती केले आहे. त्यामुळे नूतन राज्यपाल याकडे लक्ष देणार का..? ही पंचवार्षिक निवडणूक होईपर्यंत या 12 आमदारांचा प्रश्न असाच प्रलंबित ठेवणार..? सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना हा प्रश्न पुन्हा न्यायालयात गेल्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे दिवा स्वप्न पूर्ण होणार नसल्याने न्यायालयाने त्वरित निर्णय घेऊन सरकारचे कान टोचण्याची गरज असल्याचे आमदार समर्थकांत बोलले जात आहे. जोपर्यंत न्यायव्यवस्था अशा प्रकरणांमध्ये क** धोरण अवलंबणार नाही तोपर्यंत राजकारणाचा चाललेला हा खो-खो थांबणार नाही असेही बोलले जात आहे. मी नाही व्यवस्थेने सक्रिय होऊन लोक भावनेचा आदर करून बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न तत्काळ सोडविल्यास न्यायदेवतेचा विश्वास निश्चितपणे वाढणार असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये न्यायालय या बारा आमदारांच्या नियुक्तचा प्रश्न प्रलंबित ठेवणार की ताबडतोब निकाली काढणार याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या दिसत आहेत.
.png)
No comments:
Post a Comment