कनिष्ठ मुख्य अभियंता संदीप कलंत्री कोणाच्या मेहेरबानीने महापारेषणचे प्रभारी संचालक झाले
मुंबई(विशेष प्रतिनिधी):-महापारेषणच्या इतिहासात अजब घटना घडली असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्याना डावलून,ज्यांच्यावर अरेरावी,भ्रष्टाचार, बदनाम,नोकरीच्या ठिकाणी तक्रारी,पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल असतानाही संदीप कलंत्री सारख्या कनिष्ठ मुख्य अभियंत्यास महापारेषणचे प्रभारी संचालक करण्याचा घाट नेमका कोणी घातला याचा जावईशोध घेणे गरजेचे असून नेमके कोणाच्या मेहरबानीने हे असे वागतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?
महापारेषणकडे संदीप कलंत्रीपेक्षा कितीतरी वरिष्ठ अभियंता असून त्यांना बाजूला करून यांची वर्णी का लावली असावी?त्यांनी जिथे यापूर्वी नोकरी केली त्या ठिकाणी गुत्तेदार,कर्मचारी,अधिकारी यांच्यासोबत त्यांनी केलेले वर्तन,त्यांच्या अवाच्या सवा होत असलेल्या डिमांड,पडगा,भुसावळ या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध झालेल्या तक्रारी,महापारेषण प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पडगा यांनी वेळोवेळी केलेली आंदोलने,पोलिसात दाखल झालेला एफआयआर,अनेक विभागीय चौकशीचे अहवाल अजूनही पेंडिंग असताना त्यांना या पदावर बसवून कोण मालामाल होण्याचा प्रयत्न करत आहे,असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे..
माझे कुणीही वाकडे करू शकत नाही,अशी भाषा वापरून मला वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन,मर्जीतले संचालक विश्वास पाठक, एमसीएचे अमोल काळे यांचे आशीर्वाद आहेत,मला या पदावरून कोणीही काढू शकत नाही अशी भाषा वापरून अधूनमधून पार्टी फंडासाठी पैसे द्या असेही ते सर्रास मागणी करत आहेत..कर्मचाऱ्यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या आहेत,गुत्तेदारांनी लेखी कळवले आहे तरीही त्यांच्यावर कोणाची मेहरबानी आहे अशी चर्चा होत आहे..
टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप,ड्रॉईंग,ऑर्डर यामध्ये कामे मंजूर झाली असतानाही त्यामध्ये हस्तक्षेप करून गुत्तेदारांना पैश्याची मागणी करणे,अधिकाऱ्यांच्या शो-कॉज नोटिसाना केराची टोपली दाखवून मनमानी करणे अश्या गंभीर तक्रारी असतानाही त्यांना संचालक पदावर बसवण्याचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे?या गंभीर तक्रारीची महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी दखल घेऊन त्यांना पदमुक्त करावे आणि महापारेषणला लागलेले हे ग्रहण सोडवावे अशी चर्चा महापारेषणमध्ये सुरू आहे.
0 Comments