Ads

Ads Area

स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन केला अकलूजमध्ये साजरा

 स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन केला अकलूजमध्ये साजरा

        संग्रामनगर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नाव असलेल्या अकलूज येथील महाळूंग रोड वरील ढेरे-पाटील यांच्या राजगड येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी स्वामींच्या मुर्तींचे व प्रतिमेचे पुजन प्रताप मारूती ढेरे-पाटील व सौ.सारिका प्रताप ढेरे-पाटील या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिना निमित्त राजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांचे भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी १२ वाजता स्वामींवर पुष्पवृष्टी केले. त्यानंतर सजवलेल्या पाळण्यात स्वामींची मुर्ती ठेवून महिलांनी पाळणा गीत हि गायले. या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

              या कार्यक्रमासाठी अकलूज गावचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, सौ.शर्मिलादेवी किशोरसिंह माने-पाटील, सतिश माने-पाटील, अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ.शितलदेवी माने-पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राहूल जगताप व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close