महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने पंढरपुरात शाहिरी प्रशिक्षण शिबीर सुरू
पंढरपूर (कटुसत्य वृत्त): महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 12 मार्च ते 31 मार्च 2023 या कालावधीत शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंढरपूर येथील सदभावना भवन डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे हे शिबिर सुरू आहे. जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शाहीर सुभाष गोरे हे शिबिर संचालक म्हणून काम पाहत आहेत तर सहाय्यक म्हणून विक्रम गोरे व आंधळे महाराज आणि समन्वयक म्हणून विशाल मागाडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना शाहिरी पोवाडा गायन, डफ वादन, डिमडी, स्वर, लय, ताल याचे प्रशिक्षण शाहीर सुभाष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्याचे काम सध्या सुरू आहे. सदरच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्यातील वेगवेगळे नामांकित 20 शाहीर या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. यामध्ये प्रारंभीच्या सत्रात व्याख्यान सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर दुपारी 3 ते 5.30 या वेळेत पोवाडा गायन याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या अनेक विद्यार्थी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
0 Comments