पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 13, 2023

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील

 पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे.
भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages