राजकारणात अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर त्याचा सर्वत्र निषेध झाला पाहिजे- हसन मुश्रीफ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 11, 2023

राजकारणात अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर त्याचा सर्वत्र निषेध झाला पाहिजे- हसन मुश्रीफ

 राजकारणात अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर त्याचा सर्वत्र निषेध झाला पाहिजे- हसन मुश्रीफ 

सत्याचा लढा सुरूच राहणार

    कोल्हापूर (वृत्त सेवा):- राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल व पुण्यातील घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) आज सकाळी छापे टाकले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

     त्यानंतर यावर मुश्रीफ पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरांवर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरांवर ईडीची छापेमारी सुरू आहे. माझ्या मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. मी काही कामानिमित्त बाहेर आहे, त्यामुळे मला ही सर्व माहिती फोनवरूनच मिळाली. तसेच मी प्रसारमाध्यमांद्वारे असे ऐकत आहे की, माझ्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे. परंतु. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांत राहावे. कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

    पुढे सांगताना मुश्रीफ यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, दीड वर्षांपूर्वीच ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. तेव्हा हाती काहीच लागले नाही? मग आता पुन्हा माझ्यावर कारवाई कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपचे कागल तालुक्यातील एक नेते माझ्यावर कारवाई व्हावी यासाठी वारंवार दिल्लीला चकरा मारत होते. त्यांचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांना उघडपणे सांगत होते की आता मुश्रीफांवर कारवाई होणार आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. हे सर्व गलीच्छ राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया वरून कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, सर्वसामान्यांना थांबवले, पोलीस हतबल आहेत, यंत्रणा मुठीत आहे, सत्ताधारी उद्दाम आहेत, किती दिवस हा रडीचा डाव खेळणार? किती खोट्यानाट्या आरोपांत अडकवणार? सत्याचा लढा सुरूच राहणार आशा आशियाची पोस्ट केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages