Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना वैदयकीय मदत कक्ष मोहोळ तालुका समन्वयक पदी सर्फराज सय्यद यांची निवड

 शिवसेना वैदयकीय मदत कक्ष मोहोळ तालुका समन्वयक पदी सर्फराज सय्यद यांची निवड


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शिवसेना वैदयकीय मदत कक्ष मोहोळ तालुका समन्वयक पदी सर्फराज सय्यद यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत हस्ते देण्यात आले.  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आरोग्यमंत्री ना. तानाजीराव सावंत सावंत यांच्या मार्गर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत सुरु असून माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या सूचनेनुसार व नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या शिफारशीनुसार व शिवसेना वैदयकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख राम राऊत, सहकक्षप्रमुख माऊली धुळगंडे यांच्या आदेशानुसार सर्फराज सय्यद यांची शिवसेना वैदयकीय मदत कक्ष मोहोळ तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत हस्ते देण्यात आले.
सरफराज सय्यद हे निष्ठावंत शिवसैनिक असून त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

यावेळी सरकार सय्यद म्हणाले की वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडून गोरगरिबांना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार असल्याचे नवनियुक्त मोहोळ समन्वयक सर्फराज सय्यद यांनी सांगितले.

 यावेळी ओएसडी प्रवीण लटके, शिवसेना वैदयकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज जम्मा आदि उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments