Hot Posts

6/recent/ticker-posts

व्यवसाय वृध्दीसाठी आपला स्टाॅल आजच राखून ठेवा जिल्हा ग्रंथालयाचे आवाहन

व्यवसाय वृध्दीसाठी आपला स्टाॅल आजच राखून ठेवा जिल्हा ग्रंथालयाचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती अधिकार यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१३ व शनिवार दि.१४ जानेवारी या कालावधीत दोन दिवसीय 'ग्रंथोत्सव- २०२२' चे आयोजन शिवछत्रपती शिवाजी महाराज, सांस्कृतिक भवन, (रंगभवन) येथे करण्यात आल्याची माहिती जिल्ह्यातील ग्रंथालय चालकांची झूमद्वरे घेतलेल्या बैठकीत सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे.
ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतूने राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, यासाठी तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा
ग्रंथोत्सव आयोजनाचा हेतू आहे. या अनुषंगाने ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याख्यान, कवी संमेलन आदी प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या ग्रंथोत्सवात समावेश असणार आहे. तसेच साहित्य जगतातील नामवंत साहित्यिकांच्या ग्रंथ संपदेसाठी ग्रंथ दालन उभारले जाणार आहे. वाचन प्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचनासाठी व खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथाचे स्टॉल लागणार असून इच्छुकांनी प्रमोद पाटील ९९२१८००४७५ प्रदीप गाडे ९५९४९८९२५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments