Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; 117 अर्ज प्राप्त, 68 निर्गमित

 पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; 117 अर्ज प्राप्त, 68 निर्गमित

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय नियोजन भवन, पहिला मजला, सात रस्ता, सोलापूर येथे सुरू करण्यात आले असून, या संपर्क  कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  मनिषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली -उगले आदिसह मान्यवर उपस्थित होते.

             जिल्ह्यातील विकास कामे तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित असलेली कामे तात्काळ  मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून कार्यालयाचा संपर्क क्रमांक 0217-2731004 आहे. संपर्क कार्यालयाच्या समन्वयक म्हणून माढाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्क कार्यालयात नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसिलदार वाकसे नागु हरीबा (भ्रमणध्वनी क्र. 9096792147)

व तीन कर्मचारी व एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत पालकमंत्री संपर्क कार्यालयात 117 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये 68 अर्ज निर्गमित केले आहेत. 49 अर्ज प्रलंबित आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments