Hot Posts

6/recent/ticker-posts

विधिमंडळात गप्प बसणारे आमदार 'डीपीसीत' झाले आक्रमक;ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; कार्यकारी अभियंता कोळीवर कारवाई करा..!

 विधिमंडळात गप्प बसणारे आमदार 'डीपीसीत' झाले आक्रमक;ठेकेदारांना काळ्या यादीत टाका; कार्यकारी अभियंता कोळीवर कारवाई करा..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन या योजनेचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा पुन्हा उपस्थित झाला. आ. बबनराव शिंदे, आ.राजेंद्र राऊत, आ.यशवंत माने, आ.सुभाष देशमुख, आ. संजयमामा शिंदे या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या योजनेच्या कामावर पुन्हा नाराजी व्यक्त करताना ठेकेदारांचे लाड का? केले जातात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? तीन काम व्यवस्थित केले नसतील तर त्यांना काळ्या यादी टाका अशी मागणी यावेळी पुढे आली.

आ.सुभाष देशमुख हे तर आक्रमक दिसून आले.  मागच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोळी यांची चौकशी लावली होती त्याचा अहवाल आला का नाही? असा प्रश्न करत त्यांनी आपल्या मतदारसंघातील बोळकवठा या गावच्या पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उपस्थित केला. 

सर्व आमदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्या बाबतचा अहवाल आला आहे त्यांच्या कामात अनियमितता असल्याचे समोर येते, मात्र त्यांच्यावर आपणाला कारवाई करता येत नाही त्यांचे कारवाई आपण प्रस्तावित करू असे संतांनाच जे कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नाही त्यांच्या कामाची कॉलिटी तपासून कामात हलगर्जीपणा दिसल्यास अशा मक्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

Reactions

Post a Comment

0 Comments