बच्चुभाऊ कडू व पंडित साळुंकेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
माढा(कटूसत्य वृत्त):- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू आणि जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त माढा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने बच्चूभाऊ कडू यांच्या आणि पंडित साळुंके जिल्हा समन्वयक प्रहार शेतकरी संघटना सोलापूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्यात माणेगाव मध्ये शालेय साहित्य वाटप,खाऊ वाटप करण्यात आले,लऊळ या ठिकाणी मोफत पशू चिकित्सा, लसीकरण शिबिर आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,आज वाकाव या ठिकाणी रक्तदान शिबिर मोफत डोळे तपासनी शिबिर आणि शेतकऱ्यांना 10 प्रकारच्या भाजी पाल्याचे बियाणेचे वाटप आज तालुका अध्यक्ष माढा तालुका अमोल केसरे यांच्या कडून करण्यात आले होते,आजच्या या रक्तदान शिबिरासाठी 55 जणांनी रक्तदान केले तसेच 60 जणांची डोळे तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाकावचे सरपंच ऋतुराज शिवाजी सावंत लाभले होते,यावेळी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके,महावितरण चे अभियंता वैभव पळसकर वांकाव चे ग्रां.प.सदस्य माणकोजी भुसारे, त्यांच्यासोबत उपस्थित होते,प्रहार शेतकरी संघटनेने कायम समाजसेवा करण्याचा घेतलेला बच्चुभाऊ कडू यांचा वसा आयुष्यभर जपनार असल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्य माणसाला अडचणीत एकटे न सोडण्याचे आश्वासन जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी सांगितले, यावेळी तालुका, अध्यक्ष अमोल केसरे, पत्रकार बाबासाहेब लोंढे, वाकाव ग्रां.प.सदस्य माणकोजी भुसारे, तालुका उपाध्यक्ष तानाजी मोटे, तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम, विद्यार्थी तालुका अध्यक्ष प्रवीण लोकरे, दादासाहेब तांबिले,जयंत मोटे, शुभम सावंत, सोमनाथ भुसारे, गणेश सुतार, किरण लवटे, प्रणित वाघमारे,मयूर चव्हाण,पांडुरंग आरे,तेजस भुसारे,औदुंबर भुसारे,विक्रम मुसळे रणजित कोकाटे, विष्णु सुतार,अनिकेत साळुंके भारत भुसारे, सोमनाथ वायदंडे,संतोष वीर,माऊली भुसारे,लखन कदम,मेघराज मगर,पोपट भुसारे,राहुल गाडेकर असे मोठ्या प्रमाणात संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment