चंचल पाटील यांची साताऱ्याला बदली ; एस एन कोहिनकर नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 31, 2022

चंचल पाटील यांची साताऱ्याला बदली ; एस एन कोहिनकर नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

 चंचल पाटील यांची साताऱ्याला बदली ; एस एन कोहिनकर नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची प्रमोशनने बदली झाली आहे. त्यांना साताऱ्याच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. 


सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस एन कोहिनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


तसेच सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदी विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त एम जी सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


चंचल पाटील यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी 2017 साली नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली.


 यादरम्यान त्यांनी एक वर्ष समाज कल्याण अधिकारी म्हणून प्रभारी पदभार सांभाळला आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची पुण्याला बदली झाल्यानंतर त्यांचाही अतिरिक्त पदभार चंचल पाटील यांच्याकडे आला होता. सुमारे पाच वर्ष त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सेवा बजावली आहे, आता त्या प्रमोशनने साताऱ्याला जात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages