Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिकाऱ्यांची करमाळ्यामध्ये लवकरच बैठक घेणार : सचिन काळे

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिकाऱ्यांची करमाळ्यामध्ये लवकरच बैठक घेणार : सचिन काळे

       करमाळा (कटूसत्य वृत्त):- येथील मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांची लवकरच करमाळ्यामध्ये विविध विषयासंदर्भात मीटिंग घेणार आहोत अशी माहिती मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष सचिन काळे यांनी दिली यामध्ये प्रामुख्याने करमाळा तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती व भव्य मिरवणूक बऱ्याच वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून होत होती ती जयंती पुन्हा मोठ्या उत्साहाने चालू करणार असल्याचे ही काळे यांनी सांगितले . बऱ्याच पदाधिकाऱ्यांचे तसे बोलणेही झाले आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये वाढ होऊ शकते या संघटना शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या संघटना आहेत या परिवर्तनवादी संघटना जिवंत राहणे व त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्यच आहे त्यामुळे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही एक विचारधारा आहे त्या विचारधारेपासून कधीही लांब जाऊ शकत नाही पदावर असो किंवा पदावर नसतो कार्य हे निरंतर चालूच आहे राहील. 
                 करमाळा तालुक्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करमाळा तालुक्यामध्ये बरेच शिवधर्म पद्धतीने विवाह पार पडले तसेच अंत्यविधीही पार पडले शिवचरित्र हे डोक्यावर मिरवण्याचा विषय नसून ते शिवचरित्र डोक्यात घालण्याचा विषय आहे असे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ने सांगितले व स्वतःचा मेंदू कोणाचाही गुलाम ठेवू नका असे विचार सांगितले हे विचाराचे परिवर्तन करमाळा तालुक्यामध्ये चिरंतर चालू राहावे यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड उर्जित अवस्थेत राहणे गरजेचे आहे खऱ्या अर्थाने ही संघटना वाढवण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर सुजित शिंदे व बाळासाहेब सुर्वे सर यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली तसेच प्राध्यापक संजय चौधरी , प्रा नागेश माने , गणेश कुकडे करमाळा विनायक ननवरे करमाळा, संदीप रोडगे करमाळा, नितीन खटके जेऊर ,संजय गुटाळ पांगरे ,नितीन तकिक वांगी, दलित नेते सुहास ओहोळ करमाळा , जीवन होगले घारगाव, सतीश वीर गुरुजी करमाळा, सूर्यकांत पाटील बोरगाव, भीमराव लोंढे करमाळा,भैय्या घाडगे तरटगाव अजित कवडे कात्रज ,रवी घाडगे तरटगाव ,सोमनाथ शिंदे करमाळा गणेश जाधव करमाळा,डॉ नानासाहेब सरडे वीट, हरिभाऊ हिरडे पोथरे , शितोळें कोर्टी अशा अनेक दिग्गजांनी वेळ देऊन करून संघटना वाढवली आहे व नवीन विचार करमाळा तालुक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आहे .
Reactions

Post a Comment

0 Comments