गायरान जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंत्र्यांची सखोल चौकशी करा तोवर राजीनामा घ्या - अजित पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 29, 2022

गायरान जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंत्र्यांची सखोल चौकशी करा तोवर राजीनामा घ्या - अजित पवार



गायरान जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंत्र्यांची सखोल चौकशी करा तोवर राजीनामा घ्या - अजित पवार
नागपूर (नासिकेत पानसरे): तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन वाटपात असून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली.
तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. झालेला व्यवहार बेकायदेशीर असून तसे शासनाचे आदेश आहेत. कोर्टाचे निर्देश असताना झालेला व्यवहार बेकायदेशी अजित पवार यांनी सांगितले. 
गायरान जमीन हस्तांतर करताना वेगळ्या प्रकारचे आदेश आहेत. त्याची पायामल्ली करीूत गैरव्यवहार झाला आहे.  शांताबाई जाधव यांच्या अर्जावर वाशिम जिल्हाधिकारी यांनी १७ मे २०१८ रोजी दिलेला आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी रद्द केला. जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती तपासली नसल्याचा चुकीचा अभिप्राय देत एक महिन्याच्या आत पाच एकर जागा नियमित करावी असे लेखी आदेश दिले आहेत. नियमबाह्य जमीनीचे वाटप झाले आहे.यामध्ये  आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असा थेट आरोपही त्यांनी केला.
अशी गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत असून या सर्व प्रकरणी महसूल राज्यमंत्र्यांनी दलालां मार्फत जमीन वाटप केली आहे. या सर्व प्रकरणातील कागदपत्रे माझ्याकडे आहेत असे सांगत अजित पवार यांनी पुढे सांगितले की,
या जमीनी प्रकरणी वेगवेगळे आदेश निघाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करा आणि चौकशी होई पर्यंत सबंधित मंत्र्यांचा राजीनामा द्या. त्यांना मंत्रीमंडळात ठेऊ नका. अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
      या मुद्यावर बोलताना जिंतेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे गायरान जमिन प्रकरणी २०११ चा कायदा असल्याचे सांगत कायदा बाजूला ठेवून बेकायदेशीर काम केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात बसता येणार नाही. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बरोबर आहे.असे म्हटले मात्र त्यांनी कोणतेही आदेश दिले नाहीत.
यावेळी विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढेचे कामकाज पुकारले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages