हवामान बदलांबाबत जागरूक राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल : डख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 11, 2022

हवामान बदलांबाबत जागरूक राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल : डख

 हवामान बदलांबाबत जागरूक राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल : डख

बार्शी (कटूसत्य वृत्त):- सातत्याने निसर्गात होणारे चढउतार व हवामानातील बदलांबाबत जागरूक राहिल्यास नैसर्गिक आपत्तींना तोंड देवून संभाव्य पिकांचे नुकसान शेतकरी टाळू शकतील असे मत हवामान बदलांचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केले. येथील उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त आयोजित केलेल्या ५ दिवसीय राज्यस्तरीय भव्य भगवंत कृषि महोत्सवामध्ये लहरी हवामान या विषयावर ते बोलत होते. 

यावेळी व्यासपिठावर बाजार समितीचे उपसभापती झुंबर जाधव, संचालक चंद्रकांत मांजरे, प्रा. तात्यासाहेब घावटे आदी उपस्थित होते. 


बाजार समितीने शेती औजारे, रसायने, गृहउपयोगी वस्तु, खाद्य पदार्थ, शेती संबंधित विविध प्रात्याक्षिके, मनोरंजन साहित्य, वैशिष्ठेपुर्ण पशुधन यांचा समावेश असलेल्या भरगच्च कृषि प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे तसेच त्यांच्या जिव्हाळ्याच्या हवामान बदल विषयाबाबत माहिती मिळाली यासाठी आयोजित केलेल्या या व्याख्यानात डख म्हणाले, मी सतत शेतीमध्ये रमलो आहे. बालपणापासून मला निसर्गाच्या निरिक्षणाची सवय आहे. या अभ्यासाला मी शास्त्रीय माहितीची जोड दिली. त्यामुळे मला हवामानातील आगामी चढउतार तसेच संभाव्य पावसाची पूर्व कल्पना येते. प्रत्येक शेतकऱ्याने आपली निरीक्षण शक्ती वाढवली व हवामान बदलांबाबत जागरूकता दर्शविली तर आपल्याला पावसाची पूर्व कल्पना मिळु शकते. तसेच होणारे नुकसान टाळण्याबाबत पुर्वयोजना करता येते. मी व्यक्त केलेले हवामान बदलाचे अंदाज खरे ठरतात याची प्रचीती राज्याला येत आहे. मे महिन्यामध्ये २ ते १० या तारखेदरम्यान सातत्याने वारे वाहिल्यास १ महिन्याने म्हणजे जुनच्या पहिल्या आठवड्यात पाउस पडणार असा अंदाज करता येतो. तसेच जर आपल्या भागात पाऊस पडत असेल आणि जवळपास २ कि.मी. च्या अंतरापुढे पाऊस पडत नसेल तर तेथे भविष्यात पाऊस पडणार नाही असा अंदाज व्यक्त करता येतो. पावसाचा अंदाज बांधताना डख यांनी जर आपल्या भागातून विमान आकाशात भ्रमंती करत असेल आणि जोरात आवाज येत असेल तर आकाशात बाष्पीभवनाचे ढग आहेत हे लक्षात येते. आगामी १३, १४, १५ नोव्हेंबर दरम्यान पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली मात्र सोलापूर जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहील असे ते म्हणाले. येत्या महिनाभरात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. पाऊस येण्याचा अंदाज पशु, पक्षांना, प्राण्यांना येतो. चिमणी पासून ते सरड्यापर्यंत अनेक प्राण्यांच्या वर्तनात झालेले बदल टिपल्यास पावसाचे अंदाज बांधता येतात असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages