माजी आमदार राजन पाटील यांनी केली दिलगीरी व्यक्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 12, 2022

माजी आमदार राजन पाटील यांनी केली दिलगीरी व्यक्त


माजी आमदार राजन पाटील यांनी केली दिलगीरी व्यक्त

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान भीमा बचाव आघाडीचे पॅनल प्रमुख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी
केलेल्या 'त्या' वक्तव्याबद्दल समाज व सामाजिक माध्यमातून चर्चच्या व निषेध व्यक्त होऊ लागल्यावर पाटील यांना विचरले असता.
विरोधकांना पराजय समोर दिसत असल्याने माझ्या बोलण्याचा विपर्यास करीत आहेत. जो कोण बालिश बुध्दीचा माझ्या मुलांना "बाळा" म्हणून टिका करत होता. त्याला समज देण्याच्या उद्देशाने "तुझ्या लग्नाच्या अगोदर माझ्या मुलाचे लग्न होऊन मुलं झालेली होती" असे म्हणायचे होते. परंतू विरोधक जाणीवपूर्वक माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मतदारसंघात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यामुळे माझ्या मनात आदर असलेल्या महिला वर्गाचा अवमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता व नाही. तरीसुद्धा विरोधक करीत असलेल्या विपर्यासाने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करीत असल्याचेही माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.
आपली मातृ भाषा मराठी आहे आणि मराठी भाषेतील बोलण्याचा अर्थ आपण लावल तसा लागला जातो. त्याचाच फायदा घेऊन विरोधकांनी माझ्याबद्दल समाजात गैरसमज फिरविण्याचा प्रयत्न केल्याचेही राजन पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages