सध्या राज्यात हर हर महादेव ह्या मराठी चित्रपटाने जनमानसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवून राज्याचे दैवत आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र रचून शिवप्रेमी यांच्या रोषाला कारणीभुत ठरले असून ठिकठिकाणी ह्या शिवद्रोही चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात येत असून परवा ठाणे येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत ठाणे मधील एका मॉल मध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबविले असता सध्याचे राज्यातील खोकेबाझ ED सरकारने ने दडपशाही वापरत काल आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकरवी खोट्या आरोपात अटक करायला लावली,
ह्या अटकेच्या निषेधार्थ आणि राज्यभर चित्रपटाच्या विरोधात उग्र आंदोलन चालू असून पण त्या चित्रपटाचे प्रदर्शन सरकार थांबवित नाहीये, उलटपक्षी चुकीचा इतिहास दाखवून जनते मध्ये खोटी माहिती पसरविण्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोक प्रतिनिधी यांना मुद्दाम अटक करून राज्यात चुकीचा संदेश देणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव संतोषभाऊ पवार, माजी अध्यक्ष महेश गादेकर, प्रदेश सचिव शंकर पाटील, तौफिक शेख व इतर अनेक पदाधिकारी यांच्या समवेत "जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखविणाऱ्या वृत्तीचा निषेध असो, ह्या ED सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, 50 खोके खाऊन माजलेत बोके, जितेंद्र जी आव्हाड तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, जय भवानी जय शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो" ह्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
ठाण्यात सद्य स्थितीला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेच्या बाबतीत न्यायायालयात युक्तिवाद चालू असून राज्यभर आंदोलन चालू असून आज सोलापूरात हे आंदोलन करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरून घोषणा देताना आपल्या दैवताचा विकृत इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखविणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध करत असल्याचे आणि आव्हाड साहेब यांची अटक म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या खोकी खाऊन निर्ढावलेले सरकार चे अपयश असल्याचे अध्यक्ष भारत जाधव यांनी म्हटले.
यावेळी महिला पदाधिकारी सुनिता रोटे, विद्या लोळगे, लता ढेरे, लता फुटाणे, शशिकला कसपटे, वंदना भिसे, आफरीन पटेल, सुप्रिया लोमटे, ज्योती षटगार, शशिकला धांकापुरे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, निशांत सावळे, चंद्रकांत पवार, राजू भाई कुरेशी, दीपक राजगे, अमिर शेख, अनिल बनसोडे, प्रमोद भोसले, आकाश जांभळे, अल्ताफ बुरहान, बंटी यमपुरे, लक्ष्मण भोसले, लखन गावडे, सनी म्हेत्रे, सरफराज शेख, सरफराज बागवान, कुमार जंगडेकर, युण्णुस मुर्शुद, अलमेहराज आबादीराजे, मिलिंद गोरे, बिरप्पा बंडगर, सोमनाथ शिंदे नागेश निंबाळकर संपन्न दिवाकर, संजय सांगळे, इरफान शेख, संजय कुराडे, बाळासाहेब मोरे, श्रीमंत चव्हाण, दादाराव रोटे, गोवर्धन सुंचु, हेमंत चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील होता, शांततामय मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना ताब्यात घेतले.
0 Comments