भगवंत कृषी महोत्सवास नागरिकांचा वाढता प्रतिसाद; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपक्रमाच होतय सर्वत्र कौतुक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 11, 2022

भगवंत कृषी महोत्सवास नागरिकांचा वाढता प्रतिसाद; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपक्रमाच होतय सर्वत्र कौतुक

 भगवंत कृषी महोत्सवास नागरिकांचा वाढता प्रतिसाद

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपक्रमाच होतय सर्वत्र कौतुक

बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ५ दिवसीय राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून हळूहळू गर्दी वाढत आहे. आधुनिक शेती औजारे, सोलर ऊर्जा, ठिबक व तुषार सिंचन अशा स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहेत. सोयाबीन काढणी यंत्र, ड्रोन द्वारे फवारणी हे शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. 


या महोत्सवात आधुनिक पेरणी यंत्र, कडबा कुट्टी, मोबाईलवर ऑपरेट करता येणारे शेतात मोटर चालू बंद करण्याचे साधन, विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, ब्लोअर, नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र तसेच गांडूळ खत, घरगुती आटा चक्की, पापड मशीन, घरगुती शेंगा फोडणी यंत्र, सोयाबीन चाळणी यंत्र, तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले विविध पिकांचे आकर्षक वाण कृषी विभागाचा स्टॉलवर शेतकऱ्यांच्या नावासह ठेवण्यात आले आहेत. शेती संदर्भातील विविध पिकांचे पेरणी पासून काढणी पर्यंत मार्गदर्शनपर  पुस्तके, नर्सरी, पॅकेजिंग स्टॉल, शेतीआयुर्वेदिक पदार्थ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा तसेच भारतीय पोस्ट खात्याच्या विविध योजनांचा स्टॉल आहेत. शेतकरी या स्टॉल भेट देवून माहिती घेत आहेत. कांही स्टॉल धारकांना कृषी महोत्सवात बुकिंग करणारांसाठी विशेष सूट जाहीर केली आहे. तसेच महोत्सवात गृहपयोगी वस्तूंचे तसेच खाद्यपदार्थ यांचे स्वतंत्र दालन आहे. 


बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे यांच्यासह बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे, व्यापारी सचिन मडके यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages