कृषी महोत्सवात व्यापारी, उदयोजक व बाजार समितीतील श्रमजीवी वर्गाचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 11, 2022

कृषी महोत्सवात व्यापारी, उदयोजक व बाजार समितीतील श्रमजीवी वर्गाचा सन्मान

 कृषी महोत्सवात व्यापारी, उदयोजक व बाजार समितीतील श्रमजीवी वर्गाचा सन्मान 

बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवात उदघाटनप्रसंगी बाजार समितीला सर्वाधिक सेस भरणाऱ्या व्यापारी, उदयोजक तसेच बाजार समितीत सर्वाधिक श्रम केलेल्या हमाल, तोलार व मुनिम यांचा मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

बार्शी बाजारसमितीतील वैजिनाथ ट्रेडिंग कंपनीचे संतोष लोंढे यांनी बाजार समितीस सन २०२१-२२ मध्ये सर्वाधिक सुमारे १७ लाखांच्यावर सेस भरला आहे. येथील व्यापारी दिलीप गांधी यांनी व्यवहारात सर्वाधिक इ पेमेंट केले आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे व शेतमालावर प्रक्रिया उदयोग करून विविध उत्पादने तयार करणारे उदयोजक मनोहर सोमाणी, शासनाच्या ई नाम योजनेत सर्वाधिक सहभाग घेणारे राहूल एजन्सीजचे राहुल शिंदे, रिध्दी सिध्दी अॅग्रोचे तुकाराम माने, बाजार समितीत मुनिम म्हणून कार्यरत असलेले गणेश शिंदे, हमाल व तोलार म्हणून सर्वाधिक काम केलेले अनुक्रमे महंमद शेख व शिवाजी साळुंखे, तसेच बार्शी बाजार समितीअंतर्गत वैराग उपबाजारात सर्वाधिक सेस भरणारे राजकुमार गावसाने, मुनिम सतीश वाघ, तसेच धनंजय वाघ यांचा मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. बाजार समितीच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक होत आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages