लऊळ येथे मॅरेथॅान स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 31, 2022

लऊळ येथे मॅरेथॅान स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

 लऊळ येथे मॅरेथॅान स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

राष्ट्रीय एकता दिनाला युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

लऊळ (कालिदास जानराव):- कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आज लऊळ येथे कुर्डुवाडी पंढरपूर रोडवर सरदार वल्लभभाई पटेल जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने मिनी मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय उत्साही वातावरणात सकाळी सात वाजता अनेक तरूणांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी  पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तरुणांचा उत्साह वाढवत प्रोत्साहन दिले.याप्रसंगी अमित ऐदाळे,पैलवान गोविंद नलवडे,अशोक ढोरे, दिलीप ढोरे,सचिन गोसावी, सुनील माळी,दिनेश बिरकुटे, नाना धडे,रवी जानराव,नवनाथ जानराव, राज शेख, प्रविण चांदणे, प्रथमेश राऊत,गणेश मुटकुळे,बापू सलगर,अमोल देशमुख,सिध्देश्वर गायकवाड यांच्यासह पंचक्रोशीतील तरूण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याठी कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार बाळासाहेब दाढे, नितीन गोरे,गृहरक्षक सचिन खारे तसेच पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे,माळी,दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages